घरमनोरंजनआजोबा आणि नात दिसणार एकाच मालिकेच्या पडद्यावर

आजोबा आणि नात दिसणार एकाच मालिकेच्या पडद्यावर

Subscribe

मालिकेच्या शुटींग दरम्यान गौतमी ने आजोबा आणि तिचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

आजवर खऱ्या आयुष्यातल्या अनेक जोड्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन भुमिका बजावताना दिसतात. नवरा बायको, बहिण भाऊ अशा अनेक ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन जोड्या प्रेकक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. अश्याच एका नात आणि आजोबांची ऑफस्क्रिन जोडी प्रेक्षकांना ऑनस्क्रिन पाहता येणार आहे. ‘माझा होशील ना’ या मराठी मालिकेतून ‘गौतमी देशपांडे’ आणि तिचे आजोबा ‘अरविंद काणे’ हे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मालिकेच्या शुटींग दरम्यान गौतमी ने आजोबा आणि तिचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

- Advertisement -

गौतमीचे आजोबा म्हणजेच अरविंद काणे हे  १९५३ सालापासून नाट्यक्षेत्रात काम करत आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग केले आहेत. ‘तो मी नव्हेच’ चे जवळपास ७५० प्रयोग त्यांनी केलेत. आपल्या नातीसोबत छोट्या पडद्यावर काम करण्याची त्यांची खुप दिवसांपासून इच्छा होती.

काय म्हणाले गौतमीचे आजोबा ?
कॉलेज मध्ये असताना अनेक नाटकांचे प्रयोग केलं. मी माझ्या बायकोसह काम केलं. तसेच मुलीसोबत म्हणजेच गौतमीच्या आई बरोबर एकत्र काम केलं आहे. पण मला नाती सोबत काम करण्याची संधी मिळाली नव्हती. गौतमीसोबत काम करता येईल असं मला वाटलं नव्हतं. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या निमित्ताने मला गौतमी सोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला खुप आनंद होत आहे.

- Advertisement -

गौतमीच्या घरी लहानपणापासून अभिनय आणि कला क्षेत्राचे वातावरण होते. लहाणपणापासूनच गौतमी आजोबांकडून नाटकातील गंमती जंमती ऐकत आली आहे.आजोबांसोबत काम करण्याची गौतमीची हि खुप अनेक वर्षापासून इच्छा होती. माझा होशील ना मालिकेच्या निमित्ताने मला लकीली आजोबांसोबत स्क्रिन शेअर करायला मिळत आहे. माझ्यासाठी हि लाईफटाइम मेमरी आहे, त्यामुळे मला खूप भारी वाटत आहे असं गौतमीने सांगितले.
आजोबांच्या एन्ट्री नंतर माझा होशील ना ही मालिका एका रंजन वळणावर पहायला मिळणार आहे. नात आणि आजोबांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री ऑनस्क्रिन काय धमाल आणणार आहे याबाबत प्रेक्षाकांच्या मनात उत्सुकता आहे.


हेहि वाचा – सुष्मिता सेनची लेक बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -