‘माझा होशील ना’ मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील ट्रॅफिकची समस्या हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. खूप ट्रॅफीक असताना बरेच जण बेशिस्तपणाही करतात. या व्हिडीओमध्ये गौतमी देशपांडेने मुंबईच्या ट्रॅफिकमधील कृती पाहून संताप व्यक्त केला आहे.
गौतमीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, मी आता बीकेसी ते विलेपार्लेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे. तिथे मी होते आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. तर आपल्याकडे काय पातळीची हुशारी आहे. लोकांनी त्या उड्डाणपुलावर यू-टर्न घेतले. अत्यंत वेगाने जिथून गाड्या जात आहे, अशा ठिकाणाहून ते उलटे वन-वेने येत आहेत. या अशा लोकांवर काही कारवाई होतं नाही का? किंवा काही केलं जात नाही का? मला काही कळतं नाही. कारण ते अत्यंत रासरोसपणे उड्डाणपुलावरून यू-टर्न घेऊन मागे गेलेले आहेत. ज्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात. आपल्याला माहितीये ना, मुंबईत ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबायचं. हा मुर्खपणा करायचा नाही. असं करणारे तुम्ही बेअक्कल लोक आहात.
माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. या मालिकेतील तिची आणि विराजस कुलकर्णीची जोडी तर चांगलीच हीट झाली. त्यानंतर गौतमी आणि विराजस ‘गालिब’ या नाटकात एकत्र काम करताना पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी गौतमी नवरा स्वानंद तेंडुलकरबरोबर युरोप फिरायला गेली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Edited By : Nikita Shinde