Majha Hoshil Na: माझा होशील ना २ प्रेक्षकांच्या भेटीला? गौतमीच्या पोस्टची चर्चा, म्हणाली…

माझा होशील ना मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे संकेत खुद्द सई म्हणजेच अभिनेत्री गौमती देशपांडे हिने दिले आहेत. गौतमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेविषयी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

Gautami Deshpande will reveal something about Majha Hoshil Na marathi serial
Majha Hoshil Na: माझा होशील ना २ प्रेक्षकांच्या भेटीला? गौतमीच्या पोस्टची चर्चा, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na)  या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande)  आणि अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni)  महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. मालिकेला आणि कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आजही या मालिकेचे भाग झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले जातात. आदित्य आणि सईची जोडी प्रेक्षकांना भलतीच भावली. लहानांपासून मोठ्यापर्यंत ही मालिका पाहिली गेली. अनेकांनी ही मालिका संपूच नये देखील वाटत होते. मात्र प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण माझा होशील ना मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे संकेत खुद्द सई म्हणजेच अभिनेत्री गौमती देशपांडे हिने दिले आहेत. गौतमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेविषयी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

गौमती देशपांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक घडामोडी ती सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या लाडक्या प्रेक्षकांना सांगत असते. गौमती पोस्ट मध्ये म्हटलेय, ‘माझा होशील ना मालिकेविषयी मला तुम्हाला काहीतरी सांगयचे आहे. पण मला नेमकं काय सांगायचे आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येईल का? माझा होशील ना २ विषयी काही असेल का?’ असा प्रश्न गौतमीने विचारला आहे.

गौमती केलेल्या या पोस्टनंतर प्रेक्षकांमध्ये देखील एक वेगळा उत्साह पहायला मिळत आहे. प्रेक्षकही माझा होशील ना २ मालिकेसाठी उत्साही पहायला मिळाले. सई आणि आदित्या लव्ह स्टोरी पुन्हा पहायला नक्की आवडेल अशा प्रतिक्रीया सईच्या पोस्टवर पहायला मिळाल्या. अनेक प्रेक्षकांनी तर लवकर मालिकेचा दुसरा सीझन रिलीज करा असे म्हटले आहे.

माझा होशील ना या मालिकेला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र सई आणि आदित्यची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ कुठेही कमी झालेली नाही. आजही सोशल मीडियावर आदित्य सईच्या धमाकेदार केमिस्ट्रीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इतकेच नाही तर मालिकेचे शीर्षक गीत देखील आजही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यामुळे माझा होशील ना २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार का याविषयी गौमती कोणता खुलासा करते हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Corona Restriction : कसं परवडणार? संदीप पाठकने निर्बंधांवर व्यक्त केला संताप