Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनGautami Patil : गौतमी पाटीलचा अलका कुबल, सई अन् शिवसोबतचा व्हिडिओ व्हायरल

Gautami Patil : गौतमी पाटीलचा अलका कुबल, सई अन् शिवसोबतचा व्हिडिओ व्हायरल

Subscribe

गौतमी पाटील हिने आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या व्हिडिओत गौतमी अभिनेत्री अलका कुबल, सई ताम्हणकर आणि आणखी काही कलाकारांसोबत दिसली, त्यामुळे आता गौतमी सई आणि अलका कुबल यांच्यासोबत काही नवा प्रोजेक्ट करतेय का? अशी चर्चा रंगली आहे.

गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीबरोबर अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरे दिसत आहे. चौघं देखील एकमेकांशी गप्पा मारताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ मॉलच्या आवारातला किंवा एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ शेअर करत गौतमीने “सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं” असं कॅप्शन देत तिने व्हिडिओ पोस्ट केलाय. पण ही भेट योगायोगानं झाली होती की गौतमीटचा या कलाकारांसोबत कोणता नवीन प्रोजेक्ट येतोय का याचा खुलासा अजून तिनं केला नाहीयं. त्यामुळं गौतमी नक्की काय करतेय याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

- Advertisement -

 सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला.चित्रपटात मकरंद यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण होते. ‘लाईक्स आणि सबस्क्राईब’ या सिनेमातून गौतमी पाटील प्रेक्षकांच्या भेटीला आलीत्याच्या एका गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे या गाण्यात अमेयसोबत गौतमी पाटील दिसली होती.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -