घरमनोरंजनGautami Patil : चित्रपटात काम करणार का? गौतमी पाटीलनं दिलं बिनधास्त उत्तर;...

Gautami Patil : चित्रपटात काम करणार का? गौतमी पाटीलनं दिलं बिनधास्त उत्तर; म्हणाली…

Subscribe

मुंबई : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं आहे. अनके समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना कधी-कधी वाद होतो. मात्र गौतमी पाटीलचा चाहता वर्ग मोठा असल्यामुळे तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसते. तिने नुकतेच मुंबईत दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या गौतमी पाटीलने चित्रपटात काम करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात तिने बिनधास्त उत्तर दिलं आहे. (Gautami Patil Will you act in the film straightforward answer)

हेही वाचा – स्वप्नील आणि प्रसादचा ‘जिलबी’ चित्रपट

- Advertisement -

लाखों तरुणांच्या हृदयाची धकधक बनलेली गौतम पाटील तिच्या नृत्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा तिच्या कार्यक्रमात गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. तिच्या नृत्य सादरीकरणामुळे तिच्यावर टीका झालेली पाहायला मिळाली आहे. गौतमी पाटीलची एकंदर वेषभूषा, ती पायात घुंगरूही बांधत नसल्यानं ती लावणी कलावंत नाही, असे म्हणत लावणी कलावंतानी नाराजी व्यक्त केली होती. परंतु नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. यासंदर्भात तिने ‘एबीपी माझा’च्या माझा कट्ट्यावर भाष्य केलं आहे.

आयुष्यात स्वप्न काय या प्रश्नाला उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाली की, मी कधीही पुढचा विचार केलेला नाही. पुण्यात आली त्यावेळी काही स्वप्न नव्हतं, या क्षेत्रात आल्यानंतरही स्वप्न नव्हतं. घर कसं चालणार? उद्याचं काय होईल? फक्त हेच विचार डोक्यात असायचे. आताही तेच विचार असतात. त्यामुळे आजही मी पुढचा विचार करत नाही. जी ऑफर येते ती मी स्वीकारते. त्यामुळे चित्रपटाची ऑफर आल्यास नक्कीच स्वीकारेल, असं गौतमी पाटीलने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित

घुंगरू चित्रपटात झळकणार गौतमी पाटील

गौतमी पाटीलने चित्रपटाची ऑफर आल्यास नक्कीच स्वीकारेल असे स्पष्ट केले असले तरी, एप्रिल महिन्यात ती एका चित्रपटात झळकणार असल्याची बातमी समोर आली होती. ‘घुंगरू’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटातून कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा गौतमी पाटील अभिनेत्री म्हणून प्रयत्न करताना दिसणर आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून गौतमीचे चाहते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची वाट बघत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -