‘हमे तुमसे प्यार कितना’ म्हणत Kapil Sharma ने केलं Deepikaला प्रपोज

'हमे तुमसे प्यार कितना' (Hame Tumhse Pyar Kitna)  हे गाणं म्हणत कपिल शर्माने दीपिकाला प्रपोज केले आणि दीपिकाने देखील कपिल शर्माच्या सुरात सूर मिसळत गाण्याला आणखी रंग चढवला.

gehraiyaan promotion Kapil Sharma proposed to Deepika with hame tumse pyaar kitana song
'हमे तुमसे प्यार कितना' म्हणत Kapil Sharma ने केलं Deepikaला प्रपोज

अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukon)  सध्या तिच्या अपकमिंग गहराइया (gehraiyaan)  या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या दीपिका आणि टीमने कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma)  हजेरी लावली होती. कपिल शर्माच्या मंचावर नेहमीप्रमाणे कलाकारांनी धम्माल केली. शोचा एक प्रोमो समोर आला असून कपिल शर्मा नेहमीप्रमाणे दीपिकासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच कपिल शर्माने थेट दीपिकाला वेगळ्याच अंदाजात प्रपोज केले.

‘हमे तुमसे प्यार कितना’ (Hame Tumhse Pyar Kitna)  हे गाणं म्हणत कपिल शर्माने दीपिकाला प्रपोज केले आणि दीपिकाने देखील कपिल शर्माच्या सुरात सूर मिसळत गाण्याला आणखी रंग चढवला. दोघांमध्ये असलेली मैत्री यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहायला मिळाली. कपिलच्या फ्लर्टींग करण्याच्या कलेचा आणखी एक रंग त्याच्या चाहत्यांना यावेळी पहायाला मिळाला.

 

कपिल शर्माने यावेळी दीपिकाला विचारले, तु वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यास, हिस्टोरिकल सिनेमे केले, सामाजिक सिनेमे केलेस. तुला कधी कॉमेडी सिनेमा करायचा असेल तर तु कोणाला अप्रोच करशील? यावर दीपिकाला हिंट देत कपिलने म्हटले, एक मुलगा आज ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. ज्यावर दीपिका म्हणते, हो कपिल शर्मा नाव आहे त्याचे. त्यावर कपिल हो म्हणून स्मॉइल करतो. त्यानंतर दीपिका म्हणते, मला वाटते तु माझ्यासाठी सिनेमा डिरेक्ट करावा आणि त्या सिनेमात तु माझा कोस्टार असावा. तुला वाटत असेल तर तु सिनेमा प्रोड्यूस देखील करू शकतो.

दीपिकाचे हे म्हणणे ऐकून कपिल लाजत म्हणतो, दीपिकासाठी मी माझी सगळी दौलत देऊ शकतो. कपिलच्या या वाक्यानंतर दीपिका सह प्रेक्षकही पोट धरुन हसू लागतात. दीपिका आणि कपिलची ही केमिस्ट्री इथेच संपत नाही तर दीपिकाला पुढे काय प्रश्न विचारायचा हेच तो विसरुन जातो. त्यावर पुन्हा एकदा प्रेक्षक आणि दीपिका पोट धरुन हसू लागतात.


हेही वाचा – कपिल शर्मा चा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला ..