Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन लग्नात रितेश आठवेळा माझ्या पाया पडला, जेनेलियाने सांगितला भन्नाट किस्सा

लग्नात रितेश आठवेळा माझ्या पाया पडला, जेनेलियाने सांगितला भन्नाट किस्सा

Related Story

- Advertisement -

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सर्वांच आवडतं कपलं ठरलं आहे. या दोघांची केमिस्ट्री तर कमालच आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. इतकचं नाही तर दोघे मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. नुकतच जेनेलिया आणि रितेशने सोनी टिव्हिवरील डांसिंग रियालिटी शो सुपर डांसरच्या सिजन 4च्या मंचाला भेट देली. या खास दिवशी स्पर्धकांनी सुद्धा विवाहवर आधारीत नृत्याचे सादरिकरण केलं. याचदरम्यान रितेश आणि जेनेलियानी आपल्या लग्नातील आठवणींना उजाळा दिला. जेनेलिया एका स्पर्धकाचा डांस पाहून म्हणाली मला माझ्या लग्नाच्या खास दिवसाची आठवण आली. जेनेलिया म्हणाली लग्नादरम्यान रितेश माझ्या आठ वेळा पाया पडला होता. हे ऐकल्यानंतर मंचावर सगळीकडे हशा पिकला.तसेच रितेशचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता.

काय म्हणाला रितेश-

- Advertisement -

यानंतर रितेशने या सर्व घटनेचा खुलासा केला व म्हणाला आठ वेळा पाय पडण्याची विधी मला पंडीतजीने सांगितली होती. त्यांनी मला असे मुद्धाम करण्यास सांगितले कारण त्यांना माहिती होते मला लग्नानंतर हेच करावं लागेलं त्यामुळे त्यांनी माझा सराव करुन घेतला. अशा मजेशीर अंदाजात रितेशने उत्तर दिले.

व्हिडिओ पाहा – 

- Advertisement -

सुपर डांसर सिजन 4 च्या मंचावर मागील आठवड्यात अभिनेत्री करिश्मा कपूरने हजेरी लावले होती. शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक झाल्यानंतर शिल्पाने शुटींगला दांडी मारली आहे. यामुळे शोच्या मेकर्सने दर आठवड्याला प्रसिद्ध कलाकार मंचावर गेस्ट म्हणून हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.


हे हि वाचा – मृणाल ठाकूरने दिलं चाहत्यांना सरप्राइज,आगामी सिनेमाचं केलं फर्स्ट लूक रिलीज

- Advertisement -