मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख. आपल्या दमदार अभिनयनाने व मनमोहक सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रितेश-जिनिलीया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आज (25 नोव्हेंबर) रितेशचा लाडका लेक त्याचा 10 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जिनिलीयाने एक सुंदर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जिनिलीयाने लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक पोस्ट लिहिली आहे. हा केवळ रियानचा दहावा वाढदिवस नसून मलाही आई होऊन आता 10 वर्षे पूर्ण झाली असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जिनिलीयाने फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “माय बेबी बॉय… कालचा दिवस आपण ‘सिंगल डिजिट’ म्हणून साजरा केला. कारण, आज तू 10 वर्षांचा झाला आहेस. माझ्या बाळाचं मन खूप मोठं आहे आणि त्याची इच्छाशक्ती खूप जास्त दृढ आहे.
ती असंही म्हणतेय, ‘गेल्या एक दशकातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मला सुद्धा आई होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या काळात तुझ्यामुळे मला नव्याने अनेक गोष्टी शिकता आल्या. ते म्हणतात ना, आयुष्यातलं वादळ कधी संपतंय याची वाट पाहण्यापेक्षा आपण परिस्थितीवर मात केली पाहिजे. तुझ्यात हे सगळे गुण आहेत. गेल्या 10 वर्षांत तू खूप गोष्टी शिकलास आणि मलाही नव्याने जगायला शिकवलंस. आय लव्ह यू रीयान…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेबी बॉय. मी आयुष्याभर तुझी सर्वात मोठी चिअरलीडर असेन. कायम तुझ्यावर प्रेम करेन’
View this post on Instagram
दरम्यान, जिनिलीयाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्स करत रिआनला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर जिनिलीया आणि रितेश देशमुख यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. 2014 मध्ये त्यांचा पहिला मुलगा रियानला जन्म दिला. यानंतर 2016 मध्ये या जोडप्याने त्यांचा दुसरा मुलगा राहिलचं स्वागत केलं. या दोन्ही मुलांच्या संस्कारांचं नेहमीच कौतुक केलं जातं. आता तिची दोन्ही मुलं मोठी झाल्यावर अभिनेत्री पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे.