Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जेनेलियाचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीला

जेनेलियाचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीला

जेनेलियाने सुंदर लाल रंगाची साडी परिधान केली असून हातात हिरवा चुडा आणि केसात गजरा माळला आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि आवडती जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)आणि जेनेलिया देशमुख(Jenelia Deshmukh). दोघांचाही चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जेनेलिया आणि रितेश आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा त्यांच्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीनवनातील अनेक घडामोडी फोटो,व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करत असतात.(genelia deshmukh traditional look viral)

नुकतच त्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. आणि अलिकडेच रितेशने त्याच्या मुलांचा गणपतीची आरती म्हणतांनाचा एक व्हिडिओ शेअर केला होता हा व्हिडिओ पाहून सर्वांनीच मुलांचे कौतुक आणि प्रशंसा केली. जेनलिया आणि रितेश आपल्या मुलांना छान संस्कार देत आहे हे पाहून सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटले. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला जपताना , आदर करताना जेनेलिया नेहमीच दिसते. नुकतच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एका मराठमोळा लूकमधील फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

- Advertisement -

फोटोमध्ये जेनेलियाने सुंदर लाल रंगाची साडी परिधान केली असून हातात हिरवा चुडा आणि केसात गजरा माळला आहे. कानामध्ये झुमके आणि कपाळावरील लाल टीकलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

- Advertisement -

जेनेलियाची ही घायाळ अदा पाहून प्रत्येकाचे डोळे तिच्या फोटोवर स्थिरावले आहेत. जेनेलियाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील तिच्या कमेंट बॉक्समध्ये हजेरी लावली आहे.


हे हि वाचा – Met Gala2021 रेड कार्पेटवर झळकलेली भारतीय महिला सुधा रेड्डी आहे तरी कोण?

- Advertisement -