घरमनोरंजनमराठमोळ्या प्रियांका मोरेच्या 'घासजोमी' या बंगाली माहितीपटाची जर्मनवारी

मराठमोळ्या प्रियांका मोरेच्या ‘घासजोमी’ या बंगाली माहितीपटाची जर्मनवारी

Subscribe

प्रियांकाची ही पहिलीच बंगाली फिल्म आहे. फिल्मच्या निर्मितीविषयी विचारले असता प्रियंका म्हणाली, ' फिल्म मेकींग ही एक कला आहे तिला कुठल्याही भाषेचे बंधन नसत.

प्रियंका मोरे या मराठमोळ्या निर्मातीची ‘घासजोमी’ फीचर फिल्म यंदाच्या १९व्या स्टुटगार्ड या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविली जाणार आहे . येत्या २३ जुलै रोजी या ‘घासजोमी’ फिचर फिल्मचं स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. यातली मुख्य बाब म्हणजे ही फिचर फिल्म बंगाली भाषेत आहे. बंगाली भाषेचा गोडवा या फिल्म मध्ये सुद्धा उतरला आहे.

हे ही वाचा – प्रश्न हा कम्फर्ट झोनचा आहे, हिंदी चित्रपटात काम करण्यावरून अल्लू अर्जुनचं मत…

- Advertisement -

मराठमोळ्या प्रियांका मोरेने तिचे शिक्षण मास मीडियामध्ये पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मधून चित्रपटाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने कान महोत्सवात पुरस्कारप्राप्त जाहिरातीसाठी लाईन प्रोड्यूसर म्हणून सुद्धा काम केलं. तसेच प्रियांकाने निर्मिती केलेल्या अनेक शॉर्टफिल्म्सना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेलं आहे . त्याशिवाय “होली राइट्स” या डॉक्युमेंट्रीला राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सुमंत्रा रॉय दिग्दर्शित “घासजोमी” या फिल्ममध्ये अचानकपणे भेटलेल्या दोन महिलांची गोष्ट अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल, स्टुटगार्डमध्ये या फिल्मला वर्ल्ड प्रीमियरचा मान मिळाला आहे.

हे ही वाचा – हृतिक रोशनचं पुन्हा एकदा ‘शुभ मंगल’? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी

- Advertisement -

प्रियांकाची ही पहिलीच बंगाली फिल्म आहे. फिल्मच्या निर्मितीविषयी विचारले असता प्रियंका म्हणाली, ‘ फिल्म मेकींग ही एक कला आहे तिला कुठल्याही भाषेचे बंधन नसत. खरं म्हणजे, या फिल्मची  गोष्ट आणि ती सांगण्याची पद्धत मला खूप भावली म्हणून मी ती करण्याचे ठरवले . माझा बंगाली फिल्म बनवण्याचा निर्णय हा सर्वस्वी स्क्रिप्टची मागणी आणि माझे दिग्दर्शक यांच्यावर अवलंबून होता. माझा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता, पण मला यातुन खूप काही  शिकायला मिळालं. वेगळ्या संस्कृतीच्या कलाकारांना भेटणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या सोबत काम करण हा एक वेगळाच अनुभव होता. जर्मनीमध्ये मराठमोळ्या प्रियांकाच्या या फिल्मला कसा प्रतिसाद मोलतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -