Homeमनोरंजन Ghada Ghada Bolayacha : ‘घडा घडा बोलायचं’लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 Ghada Ghada Bolayacha : ‘घडा घडा बोलायचं’लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार हा स्पष्ट वक्ता आहे आणि म्हणूनच जे आपल्या मनात असतं तेच आपल्या ओठांवर असतं. असं म्हणत भूषण प्रधान आपला आगामी सिनेमा घेऊन येत आहे. ज्याचं नाव आहे ‘घडा घडा बोलायचं’.  या सिनेमाचं नाव एवढं भारी आहे की, या चित्रपटाची गाणी आणि डायलॉग्समध्ये किती वजन असेल याचा नक्की विचार करायला प्रेक्षकांना भाग पाडणारा हा चित्रपट आहे.

‘घडा घडा बोलायचं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे असून या चित्रपटात भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पटाखा’ फिल्म्स प्रस्तुत ‘घडा घडा बोलायचं’ हा चित्रपट एक संगीतमय रोमँटिक चित्रपट असणार आहे.

Ghada Ghada Bolayacha: 'Ghada Ghada Bolayacha' will soon come to the audience

‘माजा माँ’ या सिनेमात माधुरी दीक्षितच्या तरुणपणीची भूमिका साकारणारी सिमरन नेरुरकर या सिनेमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करत आहे. आरोह वेलणकरने त्याच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फनरल, चंदू चॅम्पियन, धर्मवीर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आता मात्र आरोह एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘घडा घडा बोलायचं’ या चित्रपटाच्या निमित्ताने पटाखा फिल्मस प्रस्तुत आरती साळगावकर आणि सुहास साळगावकर निर्मित त्यांचा हा पहिलावहिला मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन नितीन रोकडे यांनी केलं आहे. पटकथा राकेश शिर्के आणि महेंद्र पाटील यांनी लिहिली आहे तर संवाद राकेश शिर्के यांनी लिहिले आहेत. संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांनी केलं आहे. छायालेखक मंजुनाथ नायक, संपादक निलेश गावंड, कला दिग्दर्शक- डेव्हिड सोरेस, पोस्ट प्रोडक्शन हेड-रवी खंडेराव आहेत.
या चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद पाठक, किशोर चौगुले, पंकज विष्णू, राहुल बेलापूरकर, विशाल अर्जुन, पूनम चांदोरीकर, चित्रा कोप्पीकर या कलाकारांचा देखील या चित्रपटात सहभाग असणार आहे.

हेही वाचा : Home Decor : घराला कलर देणे आऊटडेटेड, वॉल पेपरने द्या हटके लूक


Edited By – Tanvi Gundaye