HomeमनोरंजनGhajini 2 : गजनी 2 येणार? अल्लू अरविंद आणि आमीरच्या भेटीनंतर चर्चांना...

Ghajini 2 : गजनी 2 येणार? अल्लू अरविंद आणि आमीरच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमीर खानचा ‘गजनी’ हा सिनेमा तुमच्या चांगलाच लक्षात असेल. या सिनेमात आमीरने अत्यंत वेगळी आणि लक्षवेधी भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत मोठी कमाई केली होती. दरम्यान, प्रेक्षकांनी या सिनेमाच्या मेकर्सकडे सिक्वेलची मागणी केली होती. मात्र, बराच काळ लोटूनही याबाबत कोणतीच अपडेट समोर आलेली नाही. असे असताना अलीकडेच एका सिनेमाच्या निमित्ताने आमीर आणि गजनीचे प्रस्तुतकर्ते अल्लू अरविंद यांची भेट झाली. त्यामुळे ‘गजनी’च्या सिक्वेलबाबत आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. (Ghajini 2 is coming Allu Arvind expressed desire to make sequel of it)

‘गजनी’चा सिक्वेल येणार?

2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ या सिनेमाचे अल्लू अरविंद प्रस्तुतकर्ते होते. या सिनेमाने थिएटर रिलीजवेळी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला केला होता. प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड पसंत केले होते आणि सिक्वेलची मागणी केली होती. दरम्यान, ‘तंडेल’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचसाठी अल्लू अरविंद आणि आमीर खान उपस्थित राहिले होते. यावेळी दोघांनी ‘गजनी’ सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला.

मुख्य म्हणजे, यावेळी अल्लू अरविंद यांनी आमीर खानसोबत पुन्हा सुपरहिट सिनेमाच्या निर्मितीची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच हा मोठ्या स्तरावरील चित्रपट ‘गजनी’चा सिक्वेल ‘गजनी 2’ असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी अल्लू अरविंद यांच्या इच्छेला आमीरनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘गजनी’च्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रेक्षकांकडून अल्लू अरविंद आणि आमीर खान यांची भेट ‘गजनी’च्या सिक्वेलचा संकेत असल्याचे म्हटले जात आहे.

आमीरने केलं ‘तंडेल’च्या ट्रेलरचे कौतुक

चंदू मोंडेटी दिग्दर्शित आणि अल्लू अरविंद प्रस्तुत ‘तंडेल’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी, 31 जानेवारी रोजी मुंबईत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हजर होते. आमीर खानने तंडेल सिनेमाचा ट्रेलर उत्तम असून त्याचे संगीतदेखील सुंदर असल्याचे आवर्जून सांगितले.

माहितीनुसार, ‘तंडेल सिनेमाची कथा मच्छीमारांच्या वास्तविक जीवनावर आधारलेली आहे. यात नागा चैतन्यने श्रीकाकुलम हे पात्र साकारले आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीची सूत्र बनी वासू यांनी सांभाळली आहेत. हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारी रोजी तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही पहा –

Ata Thambaycha Naay : भरत येणार परत, आता थांबायचं नाय सिनेमाचं पोस्टर लॉंच