Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Gaziabad:स्वरा भास्कर, ट्विटर इंडिया हेडवर गुन्हा दाखल

Gaziabad:स्वरा भास्कर, ट्विटर इंडिया हेडवर गुन्हा दाखल

व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही.

Related Story

- Advertisement -

उप्रदेशामधील गाझियाबादमध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला झालेल्या मारहाणीचा व्हायरल व्हिडीओवरून निर्माण झालेला वाद वाढू लागला आहे. व्हायरल व्हिडीओप्रकरणी आता दिल्लीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तसेच ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरे यांच्यासह अनेक जणांवरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आशी माहिती समोर येत आहे. गाझियाबाद मधिल व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्री स्वरा भास्करने देखील काही दिवसांपुर्वी ट्वीट शेअर होते आता स्वरा या प्रकरणात पुरती अडकली आहे.दिल्लीमधिल टिळक मार्ग पोलिस ठाण्यात अ‍ॅडव्होकेट अमित आचार्य यांनी तक्रार दाखल केली आहे. सध्या तक्रार दाखल करुनही दिल्ली पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मात्र पुढील चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे बोलण्यात येत आहे. संबधित व्हायरल व्हिडीओ प्रकरणाबाबत गाझियाबाद पोलिसांनी ९ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्हाांमध्ये काँग्रेसचे नेते, पत्रकार, ट्विटरच्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ ऊडाली आहे. लोणी बॉर्डर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षकाने हा गुन्हा दाखल केला आहे.

 

- Advertisement -

गाझियाबाद पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये पत्रकार मोहम्मद झुबैर, राणा आयुब यालोकांनी ट्विट केल्याने त्यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश केला असल्याची माहिती देण्यात आलि आहे. तसेच काँग्रेस नेते सलमान नाझमी, शमा मोहम्मद आणि मसकुर उस्मानी, लेखिका साबा नक्वी, द वायर ही कंपनी, ट्विटर आयएनसी आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केलाय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत कोणतीही पडताळणी न करता वयोवृद्ध माणसाचा व्हि़डीओ व्हायरल केल्याचा आरोप करत या प्रकरणामध्ये देण्यात आलेली सर्व माहिती चुकीची असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तसेय व्हिडीओची सत्यता न पडताळता व्हिडीओ व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचं म्हंटलं आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं आहे व्हायरल व्हिडीओमध्ये

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील वयोवृद्ध व्यक्तीने काही अज्ञात लोकांविरोधात पोलिंसाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र ही वयोवृद्ध व्यक्ती त्या लोकांना ओळखत होती. तसेच व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित वयोवृद्ध व्यक्ती अब्दुल समद ५ जून रोजी बुलंदशहरमधून बेहटा (लोणी बॉर्डर) येथे आले होते. इथून अब्दुल समद एका अन्य व्यक्तीसोबत मुख्य आरोपी असणाऱ्या परवेश गुज्जरच्या बंथला (लोणी) येथील घरी गेले होते. त्यानंतर परवेशच्या घरी काही वेळात इतर मुलं आली. यामध्ये परवेशसोबत मिळून त्यांनी अब्दुल समद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल समद हा तावीज बनावायचं काम करायचा. अब्दुल समदने बनवलेल्या एका तावीजचा कुटुंबावर उलट परिणाम झाल्याच्या रागातून त्यांना जाब विचारत मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर अनेकांनी व्हिडीओ शेअर करत एंट्री केली होती. पण शेअर करण्यात आलेला व्हिडीओ हा चुकीचा असून त्यावर लिहीण्यात आलेला मडकूरही खोटा आहे असे चैकशीदरम्यान समोर आले होत. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही ट्वीट केलं होतं. यावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला बदनाम करु नये असा सल्ला राहुल यांना दिला होता.


हे हि वाचा – पासपोर्ट प्रकरण: वैतागलेल्या कंगनाने साधला आमिर खानवर निशाणा

- Advertisement -