गिरीजा ओक गोडबोले यांच्या प्रमुख भूमिकेत साकारली जाणारी ‘चांदणी रातें’ नाट्यकृती आदित्य बिर्ला समूहाचे ‘आद्यम थिएटर’ सातव्या पर्वासह पुन्हा एकदा रंगभूमीवर परतणार आहे.
यंदा प्रेक्षकांसाठी प्रतिष्ठित लेखक Fyodor Dostoevsky यांच्या ‘व्हाइट नाइट्स’ या कथेवर आधारित नवी रंगमंचीय मांडणी, ‘चांदणी रातें’ सादर केली जाणार आहे. प्रख्यात लेखिका-दिग्दर्शिका पूर्वा नरेश यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली जाणारी ही नाट्यकृती 1 व 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईत बाल गंधर्व रंग मंदिर येथे आणि 15 व 16 फेब्रुवारी 2025 रोजी नेहरू सेंटर सभागृहात सादर केली जाणार आहे. यानंतर 1 व 2 मार्च 2025 रोजी दिल्लीच्या कामानी ऑडिटोरियममध्ये अंतिम प्रयोग होणार आहे.
गिरीजा ओक गोडबोले या प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्यांच्या सोबत मंजुळ अभिनय करणारे मंञा मुग्ध, तृप्ती खामकर, आणि इतर नामवंत कलाकारही असतील. ‘चांदणी रातें’ या नाट्यकृतीत प्रेम, विरह, हास्य, आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीचा अद्भुत संगम पाहायला मिळेल.
पूर्वा नरेश यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणारे हे नाटक संगीत, नृत्य आणि बहुप्रकारच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देईल.
हेही वाचा : Beauty Tips : कॉफी केसांसाठी फायदेशीर
Edited By – Tanvi Gundaye