घरमनोरंजनमुलींनो काहीही मागण्यास घाबरू नका... सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्यावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया

मुलींनो काहीही मागण्यास घाबरू नका… सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्यावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनालीने भारतातील मुली आळशी असल्याचं म्हटलं शिवाय मुलींना चांगले पैसे कमावणारा नवरा किंवा बॉयफ्रेंड हवा असतो. मात्र, त्या स्वतः काहीच करत नाहीत, असं ती म्हणाली. दरम्यान, आता सोनालीच्या या व्यक्तव्यावर मॉडेल उर्फी जावेदने टीका केली आहे. उर्फीने ट्वीटरवर सोनालीच्या व्हिडीओवर ट्वीट करत मुलींना मागणी करायचा अधिकार आहे असं म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीएओवर अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. अशातच उर्फी जावेदने देखील सोनालीचा व्हिडीओ रिट्वीट करत लिहिलंय की, “तुम्ही जे काही बोलत आहात ते अत्यंत असंवेदनशील आहे. आजच्या आधुनिक महिलांना तुम्ही आळशी म्हणत आहात, त्या केवळ त्यांचे कामच नाही तर त्यासोबत त्यांचे घरही सांभाळत आहेत अशा परिस्थितीत तिचा नवरा चांगला पैसा कमावणारा असावा असे तिला वाटत असेल तर त्यात गैर काय आह? शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना केवळ मुले निर्माण करण्यासाठी यंत्र मानले आणि होय, लग्नाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हुंडा. मुलींनो काहीही मागण्यास घाबरू नका. होय, मुलींनी काम केले पाहिजे हे तुमचे बरोबर आहे, परंतु हा विशेषाधिकार प्रत्येकाला मिळत नाही. कदाचित तुम्ही हे पाहू शकत नाही.” असं उर्फी म्हणाली. दरम्यान, आता उर्फीच्या या ट्वीटमुळे तिचं अनेकजण कौतुक करत आहेत.


हेही वाचा :

पंतप्रधानांकडून 5 भाषांमध्ये ‘केसरिया’ गाणं गाणाऱ्या गायकाचं कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -