त्यांना महत्त्व दिल्यामुळे मी डोअरमॅटसारखी झाले… प्रियंकाचा खुलासा

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलिवूड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी प्रियंका अनेक मुलाखती देत आहे ज्यातून तिच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींचा खुलासा होत आहे. नुकत्याच एका पार पडलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील पुरुष तिला डोअरमॅटपेक्षा जास्त काही मानत नाहीत आणि यासाठी ती स्वतः देखील जबाबदार असल्याचे तिने सांगितले.

प्रियंका चोप्राने मांडल्या वेदना

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

हॉलिवूडमध्ये जाण्यापूर्वी प्रियंका चोप्राचे नाव तिच्या अनेक सहकलाकारांसोबत जोडले गेले होते आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्या होत्या. मात्र, त्यातील कोणतेही नाते फार काळ टिकले नाही. निक जोनाससोबत लग्न करण्यापूर्वी ती अनेक अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण सर्व अपयशी ठरले. आता एका मुलाखतीत प्रियंकाने आपल्या एक्सबद्दल खुलासा केला आहे. प्रियंका म्हणाली की, “मी एकामागून एक रिलेशनशिपमध्ये राहिले. सगळ्या रिलेशनशिपमध्ये मी कधीच स्वतःला वेळ देऊ शकले नाही. मी नेहमीच काम केलेल्या कलाकारांना किंवा सेटवर भेटलेल्या लोकांना डेट केले आहे. माझ्या मनात नात्याबद्दलची कल्पना होती. जी माणसे माझ्या आयुष्यात आली, त्यांना माझ्या नात्याच्या कल्पनेत बसवत राहिले.”

प्रियंका पुढे म्हणाली की, “माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांसाठी नेहमीच केअर टेकरची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासाठी मी माझे काम सोडायचे, शूट रद्द करायचे, त्यांची काळजी घ्यायचे. आपल्याला नेहमी शिकवले जाते की, पुरुषांना नेहमी महत्त्व दाखवा. मला हे सगळं नॉर्मल वाटायचं. पण हे सगळं करून मी डोअरमॅटसारखी झाले. कारण कुटुंबाला एकत्र ठेवणं ही स्त्रीची जबाबदारी आहे असं आपल्याला सांगितलं जातं.”

या चित्रपटात दिसणार प्रियंका

प्रियंका सध्या प्राइमच्या वेब सीरिज ‘सिटाडेल’ आणि रोमँटिक ड्रामा फिल्म ‘लव्ह अगेन’ मध्ये दिसली होती. याशिवाय ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.


हेही वाचा :

कृति सेनेन सीतेच्या रुपात, नेसली 24 करेट सोन्याची साडी