घरमनोरंजन'Go Corona Go', महिलांनी पुजेसाठीच्या गर्दीवर प्रकाश राजची भन्नाट कमेंट

‘Go Corona Go’, महिलांनी पुजेसाठीच्या गर्दीवर प्रकाश राजची भन्नाट कमेंट

Subscribe

एकीकडे लोकांना घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मात्र लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कोरोना व्हायरसचे ढग जास्त गडद होत चालले आहेत.

जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना व्हायरसला आळा आघलण्यासाठी सरकारने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. देशामध्ये लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली असली तरी कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क वापरण्यासोबतच सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्वाचे आहे. पण गुजरातमध्ये सोशल डिस्टंसिंग पुरता फज्जा उडाला असल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर गुजरातमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ अहमदाबाद मधील साणंद जिल्हयामधील आहे. तेथील नयापुरा गावातील बालियादेव मंदिरामध्ये पुजा करण्यासाठी महिलांची भली मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ही गर्दी पाहून अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत मजेशीर अंदाजात टोला लगावला आहे. प्रकाश राज यांनी ट्विट करत लिहलं आहे की,” गो कोरोना गो, आपण कधी शिकणार आहोत,बसं  सहज विचारतोय.” तसेच व्हिडिओ पोस्ट करून रोष प्रकट केला आहे.

- Advertisement -

गुजरात मध्ये कोरोना काळात झालेल्या  प्रचंड गर्दीवर अनेक लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेबाबत पोलिस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. अहमदाबाद ग्रामीण भागातील डीएसपी. खेमरिया यांनी संगितले आहे की,23 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये गावातील सरपंच सुद्धा समाविष्ट आहेत. संपूर्ण देश कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर महामारीशी लढत आहे. एकीकडे लोकांना घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मात्र लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कोरोना व्हायरसचे ढग जास्त गडद होत चालले आहेत.


हे हि वाचा – ड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुवला अटक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -