घरमनोरंजनVideo: 'गोल्ड'चं नवीन गाणं व्हायरल

Video: ‘गोल्ड’चं नवीन गाणं व्हायरल

Subscribe

गोल्ड चित्रपटातील 'मोना बिना' हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात अक्षय चक्क मोना रॉयची टेर खेचताना आणि तिची मनधरणी करतानाही दिसतो आहे.

पुढच्या महिन्यात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘गोल्ड’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच अक्षयच्या गोल्ड चित्रपटातलं ‘मोना बिना’ हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. सध्या युट्यूबवर ‘मोना बिना’ गाण्याचीच जोरदार चलती आहे. सोशल मीडियावरही हे गाणं झपाट्याने व्हायरल होत आहे. अक्षय कुमार आणि मौनी रॉयच्या चाहत्यांची या गाण्आला तुफान पसंती मिळते आहे. या गाण्यात अक्षय कुमार आणि मौनी रॉयचा रेट्रो बंगाली लूक दिसत आहे. ‘मोना बिना’ गाण्यातील अक्षय आणि मोनीच्या खास बंगाली अंदाजला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. तनिष्क बागची यांनी या गाण्याची रचना केली असून यासिर देसाई आणि मोनाली ठाकूर यांनी हे गाणं गायलं आहे. गोल्ड चित्रपटातील ‘मुझे चढ गयी है’ या गाण्याप्रमाणेच, याही गाण्यामध्ये अक्षयचा दारु प्यायल्यानंतरचा झिंगलेला अंदाज पाहयला मिळतो आहे. तुम्हीही पाहा या धमाल गाण्याची ‘मोना बिना’ गाण्याची झलक :

व्हिडिओ सौजन्य-युट्यूब

हेही वाचा: अक्षयने नाकारले ‘हे’ ३ नवीन चित्रपट !

- Advertisement -

‘मोना बिना’ या गाण्याची आठवण सांगताना तनिष्क बागची म्‍हणतात, ‘या गाण्‍याचे शब्द रचण्यामध्ये अक्षयचीही मोठी मदत झाली आहे. मोनो बिना हा विचारच हा मूळात अक्षयचा होता. त्यामुळे शब्दरचनेतही अक्षयची आपसुक मदत मिळाली’. याशिवाय गाण्याच्या रचनेमध्ये रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची साथ लाभल्याचंही तनिष्क यांनी सांगितलं. तसंच मोनाली ठाकुर आणि  यासिर देसाई यांच्या आवाजामुळे या गाण्यात आणखी रंगत आल्याचंही तनिष्क सांगतात.

अक्षयबरोबर पहिल्यांदाच मौनी रॉय

‘गोल्ड’ चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता अक्षय कुमार निर्माता रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटबरोबर काम करत आहे. तर टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयचा हा बॉलीवूडमधील डेब्यू चित्रपट आहे. याव्यतिरिक्त चित्रपटामध्ये कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंह आणि सनी कौशल यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. खेळावरील आधारित चित्रपटाला नेहमीच भारतामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळं ‘गोल्ड’ चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल हे लवकरच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -