घरमनोरंजनगॉन गर्ल फेम ॲक्ट्रेस लीजा बेन्स यांचे निधन

गॉन गर्ल फेम ॲक्ट्रेस लीजा बेन्स यांचे निधन

Subscribe

माहितीनुसार त्यांना एका दुचाकी वाहन चालकाने टक्कर मारली होती, यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

गॉन गर्ल (Gone Girl) आणि कॉकटेल फेम हॉलीवुड सुप्रसिद्ध अभिनेत्री लीजा बेन्स (Lisa Banes) यांचे निधन झालं असल्याची माहिती समोर येत आहे.अभिनेत्री लीजा बेन्स न्यूयॉर्क शहरामध्ये एका हिट-अँड-रन दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालया होत्या, या दुर्घटनेनंतर लीजा बेन्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लीजा यांचे वय 65 वर्षे होते. लिंकन सेंटर जवळील मॅनहॅट्नमधिल अपर वेस्ट साइडवर एका रस्तावरील दुर्घटनेचा शिकार झल्याने अनेक कलाकारांकडून तसेच चाहत्याकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. या घटणे संबधित माहिती त्यांच्या एका प्रतिनिधी कडून देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार लीजा बेन्स (Lisa Banes) यांच्या प्रतिनिधीने सांगितले आहे की, ‘आम्ही सर्वजण लीजा यांच्या निधनाने दुखी झालो आहोत.लीजा महान , उदारता ,दया , भावनादायक महिला होत्या आणि त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य  कामसाठी समर्पित केले होते, त्या रंगमंचावर असुदे किंवा कॅमेऱ्यासमोर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्या उत्तम पत्नी, परिवार आणि मैत्रीण होत्या. आम्हाल त्यांचा साथ लाभल्याने आम्ही खरचं धन्य झालो आहोत.’

- Advertisement -

माहितीनुसार त्यांना एका दुचाकी वाहन चालकाने  त्यांना टक्कर मारली होती, यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. दुर्घटनेनंतर स्कूटर चालकाने जलद गतीने तेथून पळ काढला.  दुर्घटना लीजा जूलियार्ड स्कूल जाणाऱ्या रास्त्यावर एम्स्टर्डम एवेन्यू पार करत होती तेव्हा घडली. लीजा बेन्सचो मॅनेजर डेविड विलियम्सने असोसिएटेड प्रेसला पाठवलेल्या संदेशात या घटणेची सविस्तर माहिती दिली आहे.
सध्या पोलिसांनी हिट अँड रन आरोपीचे नाव उघड केले नहीयो. 2014 मध्ये बेन एफ्लेक अभिनीत गॉन गर्ल आणि 1988 मध्ये टॉम क्रूज़ सोबत कॉकटेल सिनेमात लीजा बेन्स यांनी सहायक भूमिका निभावली होती.तसेच बेन्स अनेक टेलीविजन शो, सिनेमात कामं केली आहेत.


हे हि वाचा – फरहान अख्तरचा ‘तुफान’ ओटीटीवर दाखल, 16 जुलैला होणार रिलीज

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -