Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन लग्नाच्या काही दिवसांतच कियारा-सिद्धार्थने चाहत्यांना गुड न्यूज

लग्नाच्या काही दिवसांतच कियारा-सिद्धार्थने चाहत्यांना गुड न्यूज

Subscribe

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारी विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईत देखील त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी मोठ्या धूमधडाक्यात एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते. दरम्यान, अशातच कियारा-सिद्धार्थने लग्नाच्या दहा दिवसातच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

सिद्धार्थ-कियाराची गोड बातमी काय?

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

सिद्धार्थ-कियाराला बॉलिवूडमधील कलाकारांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. मात्र, करण जौहरकडून या जोडीला एक अनोखी भेट मिळाली आहे. करण जौहरने या जोडीला लग्नाचे गिफ्ट म्हणून तब्बल तीन चित्रपट ऑफर केले आहेत. त्यामुळे आगामी काळात ही जोडी तीन करण जौहरच्या तीन चित्रपटांमध्ये पाहायला मिळू शकते.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नांच्या फोटोने बनवला रेकॉर्ड

- Advertisement -

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंनी काही वेळातच रेकॉर्ड बनवला, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंना 13.49 मिलियनपेक्षा जास्त इंस्टाग्राम युजर्सने लाईक केलं. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची पोस्ट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट बनली असून आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाच्या फोटोला 13.19 मिलियन लाईक्स मिळवून विक्रम केला होता. त्यामुळे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंना इतर भारतीय कलाकारांना तुलनेत सोशल मीडियावर जास्त पसंती मिळाली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न डिसेंबर 2021 मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाच्या फोटोंना 12.6 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी डी-डेवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू केला होता. 11 डिसेंबर 2017 रोजी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या फोटोंना 4.4 मिलियन युजर्सने या पोस्टला लाईक केले होते.


हेही वाचा :

हार्दिक-नताशाने केलं हिंदू पद्धतीने लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -