Preity Zinta Became Mother : गुड न्यूज, प्रिती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई

Good News, Preity Zinta Became Mother Of Twins
Preity Zinta Became Mother : गुड न्यूज, प्रिती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई

हिंदी चित्रपटसृष्टीतील ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितले आहे. प्रिती झिंटाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

प्रिती झिंटाने पती जीन गुडनेफसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने जुळ्या मुलांशी संबंधित गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रिती झिंटाची जुळी मुले एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. प्रीती झिंटा सरोगसीच्या माध्यमातून आई बनल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे पती जीन गुडइनफ याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. ‘आमच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत’ त्यामुळे मी आणि माझा पती जीन खूप आनंदी आहे. अशा आशयाचे कॅप्शन लिहित फोटो शेअर केला आहे.


हे ही वाचा – ‘योद्धा’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लुक