HomeमनोरंजनTina Ahuja : गोविंदाच्या लेकीचं पिरियडवर वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली...

Tina Ahuja : गोविंदाच्या लेकीचं पिरियडवर वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली…

Subscribe

Govinda’s Daughter on Period Cramps : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची लेक टीना ही देखील तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिचं चर्चेत असण्याचं कारण तिनं महिलांच्या मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासावर किंवा क्रॅम्प्सवर वक्तव्य केलं आहे. टीनानं आई सुनीतासोबत नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिनं महिलांच्या मासिकपाळीच्या क्रॅम्प्सवर वक्तव्य केलं आहे. त्याचीच सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे.

‘हॉटलफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत टिना म्हणाली, “मी बहुतेकदा चंदीगडमध्येच राहिले आहे आणि मी असं ऐकलंय की मुंबई, दिल्लीतल्या मुलींनाच मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. सतत समस्यांबाबत बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींमुळेच आयुष्यातील निम्म्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी ज्यांना मासिक पाळीत वेदना होतही नसतील, त्यांनासुद्धा ते मानसिकदृष्ट्या जाणवू लागलं. पंजाबमधील आणि इतर छोट्या शहरांमधील महिलांना मासिक पाळी कधी आली आणि रजोनिवृत्ती कधी झाली हेही लक्षात येत नाही. त्यांना काहीच जाणवत नाही.”

- Advertisement -

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांसाठी टिनाने महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींना जबाबदार ठरवलंय. ती पुढे म्हणाली, “माझं शरीर अत्यंत देशी आहे. मला पाठीचं दुखणं किंवा पाळीदरम्यान वेदना होत नाहीत. पण इथे मी नेहमीच बघते की मुलगी पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांबद्दल बोलत असतात. तुम्ही तूप खा, डाएट सुधारा, गरज नसलेली डाएटिंग सोडून द्या, पुरेशी झोप घ्या.. अशाने सर्व गोष्टी ठीक होतील.

पुढे टीनाचं हे वक्तव्य ऐकताच सुनीतानं तिच्या मुलीच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की “सगळ्यांनी त्यांच्या आहारावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कधीही आहारात कोणत्याही नवीन गोष्टीचा सामना करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानं म्हटलं की नंतर मला हे सांगून दोष देऊ नका की गोविंदाची पत्नी सुनीतानं एक चमचा तूप खाण्यास सांगितलं आणि हृदयात त्यामुळे ब्लॉकेज आलं आहे.” लहानपणापासून वडील गोविंदा हे माझ्या वजनाविषयी आणि खाण्यापाण्याविषयी अधिक जागरूक असायचे, असंही टिनाने सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -