Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉलीवूडला कोरोनाचा घट्ट विळखा, आता गोविंदा झाला कोविड पॉझिटीव्ह

बॉलीवूडला कोरोनाचा घट्ट विळखा, आता गोविंदा झाला कोविड पॉझिटीव्ह

याविषयीची माहिती खुद्द गोविंदाने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यात आज(रविवारी) अभिनेता अक्षय कुमारचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिनेता गोविंदालाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वारंटाईन असून घरातच त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. याविषयीची माहिती खुद्द गोविंदाने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

याविषयी माहिती देत गोविंदाने ट्विट केले की, ”मला कोरोनाची लागण झाली आहे. सकाळीच माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून मला सौम्य लक्षणे जाणवत आहेत. मात्र घरातील इतर सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वी पत्नी सुनिता हिनेही कोरोना आजारावर मात केली. मी सध्या होम क्वारंटाईन असून माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी. अशी विनंतीही गोविंदाने केली आहे.

- Advertisement -

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनेही स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. “माझा आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. मात्र, माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे”.

- Advertisement -

यापूर्वी संगीतकार बप्पी लहरी, अभिनेता अर्जून कपूर, आलिया भट, रणबीर कपूर, संजयलीला भन्साळी यांसह अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.


 

- Advertisement -