संगीत कलाविश्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय- अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडनने नुकताच यंदाचा मानाचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. चंद्रिका टंडनने साउथ आफ्रिकी बासुरी वादक वाउटर केलरमैन आणि जापानी सेलिस्ट इरु मात्सुमोतोसोबत हा पुरस्कार जिंकला आहे. यामुळे आता तिघांच्या कलेक्शनमध्ये ग्रॅमी पुरस्काराचा समावेश झाला आहे. या तिघांना त्यांच्या ‘त्रिवेणी’ या कोलॅबसाठी ‘सर्वोत्कृष्ट न्यू एज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रॅमी पुरस्कार 2025 हा सोहळा 2 फेब्रुवारी रोजी लॉस एंजेलिसमधील एरिनामध्ये आयोजित करण्यात आला होता. (Grammy Awards 2025 Chandrika Tandon win grammy for triveni)
चंद्रिका टंडन, वाउटर केलरमैन आणि इरु मात्सुमोतो यांना आपल्या विशिष्ट श्रेणीत पुरस्कार जिंकण्यासाठी रथी- महारथींचा सामना करावा लागला. ज्यामध्ये राधिका वेकारिया, रिकी केज आणि अनुष्का शंकर यांसारख्या उल्लेखनीय कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. चंद्रिका टंडनने याआधी समकालीन विश्व संगीत श्रेणीत ‘सोल कॉल’साठी 2011 मध्ये ग्रॅमी नॉमिनेशन मिळवले होते.
Congrats @wouterkellerman Eru Matsumoto and Chandrika Tandon – Grammy win for “Triveni”: Best New Age, Ambient or Chant Album #Grammys #GRAMMYS2025 pic.twitter.com/9su1DJLrbO
— Jennifer Su (Jen Su) (@jennifer_su) February 2, 2025
‘रेकॉर्डिंग अकॅडेमी’ ने दिलेल्या माहितीनुसार, तीनवेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेल्या केजला ‘ब्रेक ऑफ डॉन’साठी ‘बेस्ट न्यू एज’, ‘एम्बिएंट’ किंवा ‘चैंट अल्बम’ श्रेणीमध्ये चौथ्यांदा नॉमिनेशन मिळाले होते. या श्रेणीमध्ये प्रसिद्ध सितार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांच्या ‘चॅप्टर टू: हाउ डार्क इट इज बिफोर डॉन’लासुद्धा नॉमिनेशन मिळाले होते. मुख्य म्हणजे याच श्रेणीत राधिका वेकारियाच्या ‘वॉरियर्स ऑफ लाइट’ आणि प्रसिद्ध उद्योजिका तसेच संगीतकार चंद्रिका टंडनच्या ‘त्रिवेणी’ला नॉमिनेशन मिळाले होते. चंद्रिका टंडनने बासुरी वादक वाउटर केलरमैन आणि सेलो वादक इरु मात्सुमोतोच्या सहकार्याने ‘त्रिवेणी’ हे सुंदर कोलॅब तयार केले होते.
हेही पहा –
Sonu Nigam : लाइव्ह शोमध्ये वेदनेने कळवळला सोनू निगम, नेमकं घडलं काय?