HomeमनोरंजनGrammy Awards 2025 : लाज वाटू द्या, झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली द्यायला...

Grammy Awards 2025 : लाज वाटू द्या, झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली द्यायला विसरले ग्रॅमीचे आयोजक – नेटिझन्स भडकले

Subscribe

रेकॉर्डिंग अकादमीने आयोजित केलेला ग्रॅमी पुरस्कार सोहळा रविवारी (2 फेब्रुवारी) लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अनेक दिग्गजांना विविध श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाले. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले होते. असे असूनही सोशल मीडियावर मात्र आयोजकांना ट्रोलिंगचा मारा सहन करावा लागतोय. याचे कारणही तितकेच महत्वाचे आहे. (Grammy Awards 2025 organizers forget to pay tribute to tabla maestro Zakir Hussain)

यंदा 67 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय तबलावादक आणि तब्बल 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या झाकीर हुसैन यांना ‘इन मेमोरियम’ सेगमेंटमधून (श्रद्धांजली विभाग) अक्षरशः वगळले गेले. यामुळे संगीत प्रेमींनी आपली नाराजी व्यक्त करत आयोजकांना खडेबोल सुनावले आहेत.

आयोजक झाकीर हुसैन यांना विसरले की वगळलं?

यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली विभागातून वगळण्यात आले. यामुळे संगीत प्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आयोजकांना या चुकीबद्दल संगीत प्रेमींनी ट्रोलदेखील केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी आयोजकांना अगदी कडक शब्दात त्यांची चूक दाखवली आहे. प्रत्येक वर्षी ग्रॅमी पुरस्काराचे आयोजनकर्ते त्यांच्या ‘इन मेमोरियम मोंटेज’मध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना श्रद्धांजली वाहतात. मग, गतवर्षी झाकीर हुसैन यांचे निधन झाल्यानंतर यंदा ग्रॅमीमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहणे अपेक्षित होते. मात्र, आयोजकांना अक्षरशः त्यांचा विसर पडल्याचे दिसून आले.

मीडिया रिपोर्टनुसार, झाकीर हुसैन यांनी एकाच वर्षी एकूण 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकले होते. गतवर्षी 15 डिसेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे त्यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. ग्रॅमीच्या ‘इन मेमोरियम’ श्रेणीत जेव्हा निधन झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली दिली तेव्हा संगीत प्रेमींच्या लक्षात आले यात झाकीर हुसैन यांचं नाव नव्हतं. यावर देश- विदेशातील चाहत्यांनी आक्षेप घेत संताप दर्शवला आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्सने तीव्र प्रतिक्रिया देत रेकॉर्डिंग अकादमीला जाब विचारला आहे.

सोशल मीडियावर उसळली संतापाची लाट

सोशल मीडियावर अनेक नेटकरी ग्रॅमीच्या आयोजकांना ट्रोल करताना दिसत आहेत. यांपैकी अनेकांनी ‘ग्रॅमीच्या इन मेमोरियम सेगमेंटमध्ये झाकीर हुसैन यांचं नाव कसं नव्हतं?’, ‘झाकीर हुसैन गेल्यावर्षीचे विजेते आहेत आणि तरीही तुम्ही त्यांना कसे विसरलात?’ अशी विचारणा केली आहे. ‘श्रद्धांजली विभागात त्यांचा उल्लेख न करणं ही खरोखरचं एक मोठी चूक आहे’, ‘ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि अनेकदा ग्रॅमीचं नामांकन मिळूनही झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली विभागात समावेश नाही, खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे’, ‘तुम्ही झाकीर हुसैन यांना विसरलात की मुद्दाम वगळलात?’ असाही सवाल काही युजर्सने केला आहे.

दरम्यान, या वर्षीच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज संगीतकारांना आदरांजली वाहण्यात आली. ज्यामध्ये लियाम पेन, क्रिस क्रिस्टोफरसन, सिसी ह्यूस्टन, टिटो जॅक्सन, मारियान फेथफुल, सेजी ओझावा, जो चेंबर्स, जॅक जोन्स, मेरी मार्टिन आणि एला जेनकिन्ससारख्या नावांचा समावेश आहे.

हेही पहा –

KP Choudhary: कबाली सिनेमाच्या निर्मात्याची आत्महत्या, नैराश्यातून संपवले जीवन