घरमनोरंजनgudi padwa 2021: अमृताने गुढीपाडवा सणाच्या आठवणींना दिला उजाळा

gudi padwa 2021: अमृताने गुढीपाडवा सणाच्या आठवणींना दिला उजाळा

Subscribe

हिंदू नववर्षाची सुरुवात होते ती गुढीपाडवा या सणापासून. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक मराठमोळी वेषभुषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिंदू बांधव घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी अथवा नवी कोरी साडी बांधून चांदीचा अथवा तांब्याचा उपडा गडू, कडूलिंबाची दहाळी व आंब्याची पाने व साखरेच्या गाठी फुलांचा हार गुढीला बांधून उंच ठिकाणी उभारतात. मुंबईसह राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जातो. परंतु यंदाचे वर्ष आणि याआधीचे वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घरोघरीच साजरा करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन वर्षे गुढीपाडव्याचा भव्य उत्साह कुठेतरी मावळला आहे. या सणानिमित्त अस्सल मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या गुढीपाडवा सणाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे.
यंदा कोरोना संसर्गातही अमृताचा गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्याचा उत्साह कुठेही मावळला नाही. अमृताने गुढीपाडव्यानिमित्त फिल्मीबिट या मनोरंजन वेबसाईटला मुलाखत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

- Advertisement -

यावेळी यंदा गुढीपाडवा सणानिमित्त ठरलेल्या प्लॅनबद्दल अमृता सांगते, दरवर्षीप्रमाणे यंदाही मी आणि माझी आई पहाटे लवकर उठून आवराआवर करत महाराष्ट्रीयन संस्कृत पेहराव, दागदागिन्यांचा साज चढवत गुढी उभारुन महाराष्ट्रीय नववर्षाचे स्वागत केले. घराबाहेर उंच झेपावणाऱ्या गुढीला नवी कोरी महाराष्ट्रीय लोकांच्या आवडीचे हिरव्या, लाल, निळा रंगांपैकी एक रंगाची साडी बांधली जाते. माझ्याचे आवडीचे हे सगळे रंग आहेत. आमची गुढीला दरवर्षी हिरव्या रंगाची साडी बांधली जाते. अशा प्रकारे एक नव चैतन्याची, उत्साहाची गुढी उभारून आम्ही हा सण साजरा करतो. मी आणि आई साडीमध्ये फोटो काढण्याचा मनमुराद आनंद घेतो.

कोरोनामुळे व्हर्चुअल गुढीपाडवा साजरा करावा लागत आहे याबद्दल सांगताना अमृता सांगते, या सणानिमित्त नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना कॉल करत प्रत्येकाला हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो. या दिवसापासून आयुष्यात सर्वकाही नवी गोष्टीला सुरुवात करते. माझी बहिण दुबईमध्ये असते तर चुलत भावंडे युएसला असतात त्यामुळे एकत्र येण जमत नाही तर आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गुढीपाडवा सेलिब्रेट करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

- Advertisement -

गुढीपाडव्यानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत अमृता सांगते, गुढीपाडव्याचा खरा आनंद, उत्साह, जल्लोश हा पुणे, गिरगावात असतो. गिरगावात माझे वडीलांचे बालपण गेले, आम्हीही अनेक वर्षे गिरगावात राहिलो. गिरगावात प्रत्येकाच्या दारासमोर नवरंगांची उधळण करणाऱ्या गुढ्या दिसतील. गुढीपाडव्याची खरी मज्जा नाद घुमाणाऱ्या ढोल ताशांचा गजरांचा आनंद घेण्यात आहे. अस्सल मराठमोळ्या साड्या, दागदागिण्यांचा साजशृंगार परिधान केलेल्या तरुणी, मराठमोळे सदरा, लेहंगा परिधान केले तरुण या सणाची शान आणखी वाढवतात. याप्रमाणे पुण्यातही गुढीपाडव्याचा उत्साह काही औरचं असतो. एकामेकांना गोडधोड देत सणाचा आनंद आणखी वाढवला जातो. परंतु य़ंदा कोरोना संसर्गामुळे प्रत्येकालाच घरात राहूनच सण साजरे करावे लागत आहेत. त्यामुळे आम्ही यंदा व्हर्चुवल गुढीपाडवा साजरा करत असे अमृता सांगते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -