घरमनोरंजनराहुल वैद्य आणि दिशा परमारने साजरा केला गुढीपाडवा, राहुलच्या आईकडून दिशाला नऊवारी...

राहुल वैद्य आणि दिशा परमारने साजरा केला गुढीपाडवा, राहुलच्या आईकडून दिशाला नऊवारी साडी, नथ भेट

Subscribe

घरातील सदस्य मानतात, त्यांनी दिशाला नऊवारी साडी तसेच नथ असा मराठमोळा साज भेट दिला आहे

साडेतीन मुहूर्त पैकी शुभ मानला जाणार्‍या नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या अनेक कलाकारांनी मराठमोळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांना शुभेचा दिल्याआहेत. प्रसिद्ध गायक तसेच बिग बॉस फेम राहुल वैद्यने आपल्या प्रेयसी दिशा परमार सह गुढीपाडवा साजरा केला. तसेच चाहत्यांना नवीनवर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल आणि दिशा अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांन सोबत आहेत. तसेच राहुल आणि त्याचे घरचे दिशाला आपल्या घरातील सदस्य मानतात, त्यांनी दिशाला नऊवारी साडी तसेच नथ असा मराठमोळा साज भेट दिला आहे. एका मुलाखती दरम्यान राहुलने गुढीपाडव्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ”गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होणे,तसेच पुजा करणे,गुढी उभारणे,पुरणपोळया खाणे, आईच्या हातच्या पुरणपोळया हे माझ्यासाठी यासणाचे खास वैशिष्ठ्य आहे. तसेच राहुल दिशा बद्दल सांगताना म्हणतो की दिशा या खास सणाच्या दिवशी माझ्या सोबत आहे याचा मला खूप आनंद होत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ragini ✨ (@rp_rkvian)

- Advertisement -

दिशा परमारने देखील नूतन वर्षाच्या शुभेच्छा देत म्हणली ”मी एक सरदारणी आहे. नवर्षाचाहा सण माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. तसेच मी गुढीपाडवा साजरा करण्यासाठी खूप उत्सुक आहे. राहुल आणि त्याच्या घरचे ज्याप्रकारे सण साजरा करतात गुडी उभारतात,पुजा करतात त्याप्रकारे मीसुद्धा सण साजरा करणार आहे. आपल्या घरातील लोकांसोबत सण उत्सव साजरा करणे यापेक्षा खास क्षण काही असूच शकत नाही असे दिशा म्हणाली. तसेच मला भेट दिलेला मराठमोळा साज परिधान करण्यासाठी आतुर आहे. राहुल च्या आईकडून खूप काही शिकणार आहे.”
राहुल आणि दिशाने सोशल मीडिया वर गुढी उभारताना, पूजा करतानाचे काही खास क्षणाचे फोटो आपल्या चाहत्यांन सोबत शेअर केले आहेत.


हे हि वाचा – gudi padwa 2021: अमृताने गुढीपाडवा सणाच्या आठवणींना दिला उजाळा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -