घरताज्या घडामोडीVideo - लॉकडाऊनमध्ये विकीचा हेअरकट कोणी केला माहितेय का?

Video – लॉकडाऊनमध्ये विकीचा हेअरकट कोणी केला माहितेय का?

Subscribe

‘उरी’ चित्रपटा ऐवढीच उरीतील प्रमुख अभिनेत्याची चर्चा झाली तो अभिनेता म्हणजे विकी कौशल. सध्या लॉकडाऊन असलं तरी सोशल मीडियावर विकीचीच हवा आहे. विकी सोशल मीडियावर खूप अऍक्टीव्ह असतो. तो नेहमी आपले क्लासीक व्हीडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. चाहतेही त्याच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रीया देतात. सध्या सोशल मीडियावर विकीच्या लॉकडाऊन हेअरकटची चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

#QuarantineCut by @sunsunnykhez ???‍♂️

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

- Advertisement -

नुकताच विकीचा एक नवा लूक समोर आलाय. यात विकीने नवा हेअरकट केला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. लॉकडाऊनच्या काळात विकीचा हेअरकट कोणी केला?  तर विकीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल याने विकीचा हेअरकट केलाय. लॉकडाऊनच्या काळात धाकट्या भावाकडून नवीन हेअरस्टाईल्स करुन घेतली आहे.

- Advertisement -

विकीने त्याच्या नवीन लूकची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. स्वत: चा एक फोटो शेअर करत त्यानं ‘#QuarantineCut’ असं कॅप्शन दिलंय. सनीने केलेल्या या हेअरकटचं विकीच्या चाहत्यांनी कौतुक केलंय. त्यामुळे विकीच्या नव्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.

लॉकडाऊनमध्ये विकीचीच चर्चा

लॉकडाऊनच्या काळात विकी सोशल मीडियावरुन आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन त्याचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो. मग त्यात कधी घरातील फॅन साफ करतानाचा तर कधी स्वयंपाकघरातला व्हिडिओ असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -