“मी स्वतःशीच लग्न केलं कारण मला…..”क्षमा बिंदूने सांगितलं आत्मविवाह करण्यामागचे कारण

क्षमा बिंदूच्या या आत्मविवाहाला गुजरातमध्ये एकल विवाह म्हणजेच Sologamy चे पहिले उदाहरण मानले जाते. क्षमा बिंदूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे सर्व फोटो शेअर केले आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून गुजरात मधील क्षमा बिंदू नावाची २४ वर्षीय तरूणी स्वतःशीच लग्नगाठ बांधणार असल्याची बातमी चर्चेत होती. ९ जून रोजी तिचा हा आत्मविवाह पार पडला. लग्नामध्ये त्या प्रत्येक प्रथा पूर्ण केल्या गेल्या ज्या इतर लग्नांमध्ये केल्या जातात. इतकंच नव्हे तर लग्नापूर्वी क्षमा बिंदूने लग्नाआधीच्याही सर्व पद्धती कुटुंबीय आणि मित्र परिवारसोबत साजरा केल्या. लग्नापूर्वी तिने मेहंदी, हळद यांसारख्या सर्व क्षण साजरे केले. शिवाय लग्नापूर्वी तिने लग्नामध्ये घालण्यासाठी लाल रंगाचा लेहंगा सुद्धा घेतला होता.

क्षमा बिंदूच्या या आत्मविवाहाला गुजरातमध्ये एकल विवाह म्हणजेच Sologamy चे पहिले उदाहरण मानले जाते.
क्षमा बिंदूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे सर्व फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्षमा बिंदू आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र परिवारसोबत आनंदी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshama Bindu (@kshamachy)

वडोदरामधील सुभानपुरा रोडवर भाड्याच्या घरामध्ये राहणारी क्षमा बिंदूने जेव्हा ती आत्मविवाह करणार असल्याची बातमी समोर आली तेव्हा ती चांगलीच चर्चेत आली. मात्र त्यावेळी तिने एका मंदिरात हिंदू समारंभात आत्मविवाह करणार असल्याचे सांगितले होते. परंतु अचानक तिने सांगितलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच तिने लग्न केले.

नवरदेवाशिवाय केलं लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshama Bindu (@kshamachy)

वडोदरा शहरातल्या सुभानपुरा येथील राहणारी क्षमा बिंदूने आत्मविवाह केलेला आहे. तिने तिच्या नातेवाईक , मित्र परिवाराच्या साक्षीने स्वतःशी स्वतःचे लग्न केले. तिच्या लग्नामध्ये कोणीही पंडित यायला तयार नव्हते. त्यामुळे क्षमा बिंदूने स्वतःच ‘गंधर्व विवाह’ केला आणि स्वतःचं स्वतःला मंगळसूत्र घातले, शिवाय स्वतःच स्वतःला कुंकू लावून घेतले. तसेच लग्नामध्ये पंडित नसल्याने मोबाईलवर मंत्र लावून लग्न पार पाडले.

आत्मविवाह करण्यामागे हे आहे कारण

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshama Bindu (@kshamachy)

 स्वतःशी लग्न केल्यानंतर क्षमा बिंदू म्हणाली की, “हे लग्न माझ्यासाठी खूप खास आहे. आता मला कोणावरही अवलंबून राहता येणार नाही. भविष्यात मी कोणाचीही पत्नी होणार नाही, दुसरे लग्नही करणार नाही”. तसेच ती म्हणाली की, “माझे स्वतःवर खूप प्रेम आहे आणि मी स्वतःला खूप चांगले ओळखू शकते”.


हेही वाचा :यूरोपमध्ये होणार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मिया छोटे मिया’ चे शूटिंग