Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनGuru Randhawa : स्टंट शूटिंगदरम्यान गायक-अभिनेता गुरू रंधावा जखमी

Guru Randhawa : स्टंट शूटिंगदरम्यान गायक-अभिनेता गुरू रंधावा जखमी

Subscribe

लोकप्रिय गायक आणि अभिनेता गुरु रंधावा यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. गायनाव्यतिरिक्त, तो त्याच्या अभिनयासाठी देखील ओळखला जातो. सध्या तो त्याच्या ‘शौंकी सरदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याच्याबद्दल एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरंतर स्टंट करताना अभिनेत्याला खूप दुखापत झाली. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूने स्वतः सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून सर्वांना ही माहिती दिली आहे. फोटोत, गुरु हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे.

फोटो शेयर करत दिली माहिती :

अलिकडेच, चित्रपटाच्या सेटवर एका अॅक्शन सीन दरम्यान त्याला दुखापत झाली. त्याने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. गुरु रंधावा नुकतेच त्यांच्या पंजाबी चित्रपट ‘शौंकी सरदार’चे चित्रीकरण करत होते. यादरम्यान, एका अ‍ॅक्शन सीनमध्ये काम करताना त्याला दुखापत झाली. त्याने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्याने त्याच्या दुखापतीबद्दल सांगितले. गुरु रंधावा यांनी फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझा पहिला स्टंट, माझी पहिली दुखापत, पण माझे धाडस अबाधित आहे.’ शौंकी सरदार चित्रपटाच्या सेटवरील एक आठवण. अ‍ॅक्शन सीनचे काम करणे खूप कठीण आहे, पण मी माझ्या प्रेक्षकांसाठी कठोर परिश्रम करेन.

चाहत्याप्रमाणेच सेलिब्रिटींनीही दिला धीर :

गुरुची ही पोस्ट पाहून त्यांचे चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटीही चिंतेत आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूरने कमेंट करत लिहिले आहे की केली आणि लिहिले, “क्या बात है”. तसेच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कमेंट करत म्हटले आहे की, “तू सर्वोत्तम आहेस. लवकर बरा होशील.” यासोबतच, चाहते अभिनेत्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. गुरुचा ‘शौंकी सरदार’ हा चित्रपट 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

शौंकी सरदार :

‘शौंकी सरदार’ या चित्रपटात बब्बू मान, निमृत अहलुवालिया आणि गुग्गु गिल दिसणार आहेत.विशेष म्हणजे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट धीरज केदारनाथ रतन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि पंजाबची संस्कृती, मूल्ये आणि भावना दर्शविणारी एक शक्तिशाली कथा यामधून सादर करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा : Mahashivratri 2025 : महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा


Edited By – Tanvi Gundaye