घरमनोरंजनH2O... कहाणी थेंबाची !

H2O… कहाणी थेंबाची !

Subscribe

लवकरच H2O म्हणजेच पाण्यावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

आपल्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अन्न,वस्त्र, निवारा आणि पाणी या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. विज्ञानाच्या भाषेत पाण्याला H2o असं म्हणतात. याच नावावर आधारित एक H2o असा चित्रपट येत आहे.

- Advertisement -

काय आहे पोस्टरमध्ये

या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले. या पोस्टरमध्ये ‘H2O ‘ या चित्रपटाच्या नावासोबतच “कहाणी थेंबाची” अशी टॅगलाईन देखील आहे. संपूर्ण कोरड्या आणि तडे गेलेल्या जमिनीवर पाण्याचे मोजकेच थेंब दिसत आहेत. त्यामुळे हा सिनेमा पाण्यावर भाष्य करणारा असू शकतो. दुष्काळाशी निगडीत विषय चित्रपटाचा आहे असं वाटतं. दुष्काळाबरोबरच आणखी एख विषय चित्रपटात असण्याची शक्यता आहे. कारण या पोस्टरमध्ये एका पायात बूट तर एका पायात चप्पल घातलेल्या व्यक्तींचे पाय दिसत आहे. यावरून हा सिनेमा दोन भिन्न विचार असलेल्या व्यक्तींवर आधारित असावा असे वाटते.

- Advertisement -

सुप्रित निकम दिसणार H2O मध्ये

अभिनेता सुप्रित निकमने या चित्रपटाच पोस्टर शेअर केलं आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रित H2O च्या सेटवरचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत त्याच्याबरोबर अभिनेत्री किरण पाटील दिसली. हा फोटो शएअर करताना सुप्रितने व्हीलन असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे या चित्रपटात तो व्हीलनच्या भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे.मात्र या चित्रपटाचा नेमका विषय कोणता असणार आहे? यात कोणते कलाकार असणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच यातील कलाकारांची नावं जाहीर होतील.

मिलिंद पाटील दिग्दर्शित ‘H2O ‘ या सिनेमाची निर्मिती सुनिल म. झवर यांनी केली आहे. ‘H2O’ हा सिनेमा १२ एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -