“हा शरद पोंक्षे तूच ना?” पोंक्षेंचा जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकरांनी विचारला प्रश्न

खरंतर हा व्हिडिओ २०१९ मधील असून त्यांनी एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कॅन्सर या आजाराविषयी सांगितले होते. यामध्ये ते म्हणाले होते की

सध्या संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींकडे लागून राहिलेले आहे. शिवसेना नेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान या परिस्थितीबाबत राजकीय क्षेत्रासोबतच सिनेसृष्टीतील कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत. यापैंकी काहीजण एकनाथ शिंदे गटाची पाठराखण करत आहेत, तर काहीजण उद्धव मुख्यमंत्री ठाकरे यांना आपला पाठिंबा देत आहेत. यासगळ्यात मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी सुद्धा आपले मत मांडले आहे, ज्यामध्ये त्यांनी एक पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना न कळत पाठिंबा दिलेला आहे. यावर आदेश बांदेकर यांनी शरद पोक्षेंचा एक जुना व्हिडिओ शेअर त्यांना प्रत्युत्तर करत केले आहे.

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शरद पोंक्षेंचा मुलाखती दरम्यानचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडिओ २०१९ मधील असून त्यांनी एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कॅन्सर या आजाराविषयी सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

यामध्ये ते म्हणाले होते की, “माझ्या मदतीला सगळ्यात पहिला धावून आला तो आदेश बांदेकर. मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता डॉक्टरांकडून सांगितली जात आहे. आदेश मला म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी उद्याच तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. आदेशने मला त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सर्व प्रोसेस सुरु झाली. अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे माझा हा आजार उद्धव ठाकरे यांना कळला. तेव्हा मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.”
हा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी शेअर करत “हा शरद पोंक्षे तुच ना?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये विचारलेला आहे.

शरद पोंक्षेंचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच शरद पोंक्षे यांचे दुसरे वादळ हे पुस्तकाचा फोटो सुद्धा दिसत आहे. याशिवाय या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं….सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असे पोस्टवर लिहिले आहे.

 


हेही वाचा :‘जुग जुग जियो’ ठरला बॉलिवूडमधील कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट