सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली तुम्हा सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे हिचा लग्नानंतरचा पहिला होळीचा सण आहे. तितिक्षाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे तर उत्सुकता तर आहेच. होळीच्या विषयावर आहोत तर एक गोष्ट अजून सांगेन की मी तितकीशी होळी खेळात नाही कारण कामामुळे वेळ कमी मिळायचा त्यामुळे होळी खेळणं कमी होत गेलं. पण जेव्हा मी ठरवून होळी खेळायला जाते तेव्हा त्वचेवर आणि केसांना कॅब्रेल तेल लावून जाते. हे केल्यानी रंग लगेच निघतो आणि कमी त्रास होतो. मी नेहमी नैसर्गिक रंगानी होळी खेळायचा प्रयत्न करते.”
‘नवरी मिळे हिटलरला’ मधली वल्लरी विराज सांगते, ” मी होळी खेळायला जायच्या आधी बेबी ऑइल किंवा खोबरेल तेल लावते ज्याने रंग त्वचेवर चिटकून राहत नाही. केसांना ही तेल लावते आणि छान एक वेणी, बन किंवा पोनी बांधते. होळी खेळून आल्यावर अंघोळ करून क्रीम लावते.जर रंग निघत नसेल तर लिंबू ही लावून रंग काढायचा प्रयत्न असतो.”
अक्षया हिंदाळकर जी ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मध्ये वसुंधराची भूमिका साकारत आहे तिने सांगितले,”लहानपणी होळी खेळायला जायची तेव्हा मला लक्षात आहे की माझी आई मला बसवून केसांना भरभरून तेल लावायची त्यानंतर केस बांधायची आणि त्वचेवर तेल, क्रीम किंवा सनस्क्रीन लावायची. मला काही रंगांची ऍलर्जी आहे म्हणून आम्ही ऑरगॅनिक रंगांचा वापर करायचो. पण जस काम सुरु झालं होळी खेळता आली नाही. पण लहानपणीच्या गोड आठवणी आहेत.”
सारं काही तिच्यासाठीची निशी म्हणजे दक्षता जोईल सांगितले, “मी लहानपणी मैत्रिणींसोबत होळी खेळायचे तेव्हा माझी आई नेहमी मला तेल लावून पाठवायची कारण खूप भयानक रंग वापरले जायचे तेव्हा. सोनेरी, भडक रंग , काही जण तर ऑइल पेंट ही लावायचे म्हणून आई खूप तेल लावून मला बाहेर पाठवायची. हे तर केस आणि त्वचेसाठी झालं त्यासोबत सगळ्यात जुने कपडे शोधून ते घालायचे हे ठरलेलं असायचं. होळी खेळून झाल्यावर ही अंघोळ केल्यानंतर ही मॉइश्चरायझर किंवा तेल लावते.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मधली शिवानी नाईक ने सांगितले, लहानपणी होळीच्या रात्री मी झोपायचीच नाही, आम्ही सर्व गच्चीत फुगे बनवणे आणि रंगाचे पाणी तयार करणे, कोरडे रंग एका ताटात काढणे हा सर्व कार्यक्रम सोसायटीच्या गच्ची वर चालू असायचा. त्या दिवशी सकाळी आई-बाबा नेहमी सांगायचे की डोक्यापासून पायाच्या बोटा पर्यंत तेल लावून जा होळी खेळायला आणि मला वाटत हा उपाय घरो घरी वापरला जात असावा. सर्वानी नैसर्गिक रंगानं सोबत होळी खेळली तर कोणालाही तितका त्रास होणार नाही.”
पारू मधली शरयु सोनावणे सांगितले, “लहानपणी जसं मनाला येईल तसं होळी खेळायचे कुठचे ही रंग वापरायचो, कोणत्या ही पाण्यात होळी खेळायचो. पण जेव्हा पासून मला कळायला लागेल तेव्हा पासून होळी खेळणं मी बंद केलय. माझ्या घरी माझा एक पेट आहे त्याला बघून समजायला लागले की प्राण्याना रंगांचा त्रास होतो. मला माझ्या पेटला त्रास झालेला सहन नाही होणार त्यामुळे होळी खेळणं बंद केलं. पण एक रंगाचा टिळा मी नक्की लावते. मी सर्वाना सांगू इच्छिते की होळी खेळताना तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या त्यांना रंग लावू नका.