घरमनोरंजनअभिषेकच्या वाढदिवसानिमित्त श्वेता बच्चनची खास पोस्ट

अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त श्वेता बच्चनची खास पोस्ट

Subscribe

अभिषेक बच्चनचा आज 48 वा वाढदिवस आहे. 5 फेब्रुवारी 1976 रोजी अभिषेकचा मुंबईमध्ये जन्म झाला होता. अभिषेक बच्चन अनेकदा त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असून अभिषेक बच्चनचा चित्रपटसृष्टीतील संघर्षाचा अनेकदा सामना करावा लागला. पण तरीही आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिषेकने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान मिळवलं आहे. आज अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याला अनेक शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, अभिषेकची बहिण श्वेता बच्चनने देखील त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

श्वेता बच्चनची पोस्ट चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता श्वेता बच्चनने एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिषेक आणि श्वेता कँडी खाताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत श्वेताने लिहिलंय की, “असं नाही… की तुला माहित आहे म्हणजे तुलाच माहित आहे. हे फक्त तुला आणि मलाच माहित आहे. आज तुझा मोठा दिवस आहे लहान भावा… आशा आहे की तु गाण्याचा आनंद घेशील… लव्ह यू” असं श्वेताने लिहिलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

- Advertisement -

‘या’ चित्रपटात दिसणार अभिषेक

अभिषेक बच्चन याआधी सैयामी खेरसोबत ‘घूमर’ चित्रपटामध्ये दिसला होता. आता तो आगामी काळात ‘गुलाब जामुन’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच तो धूम 4 मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा : Happy Birthday Abhishek : अभिषेक बच्चनचे 5 सुपरहिट चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -