Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Happy Birthday Asha Bhosle: ८८ व्या वर्षीही आशा भोसलेंचा करिष्मा कायम

Happy Birthday Asha Bhosle: ८८ व्या वर्षीही आशा भोसलेंचा करिष्मा कायम

Related Story

- Advertisement -

आपल्या सुमधुर गायनाने (music)रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी दिग्गज गायिका आशा भोसले (asha bhosle)यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. (Happy Birthday Asha Bhosle)दरवर्षी आशाजी (Ashaji)त्यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करतात. संपुर्ण कुटुंब एकत्र येऊन आशाजीसांठी हा दिवस अविस्मरणीय रित्या साजरा करतात. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्र राज्यात झाला होता. अगदी बालपणापासूनच आपल्या बहिणीप्रमाणे आशाजींना सुद्धा गायनाची प्रचंड आवड होती. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून गायनास सुरुवात केली. 19 व्या शतकातील लोकांपासून ते आजच्या फॉरर्वड जनरेशनपर्यंत्न आशाजींच्या गाण्याची जादू कायम आहे. संगिताच्या जगतामध्ये आशा ताईंनी भली मोठी कामगिरी केली आहे. आजतागयत त्यांनी 20 भाषामध्ये 16 हजारांहून अधीक गाणी गायली आहेत. आणि यामुळे सर्वाधीक स्टूडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांना तब्बल दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसेच सातवेळा फिल्म फेयर पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.(Happy Birthday Asha Bhosle: Asha Bhosle’s magic continues even at the age of 88)

आशा ताईंनी शास्त्रीय संगीतासह गझल आणि पॉप संगीत गायले.त्यांनी केवळ हिंदीमध्येच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्येही गाणी गायली आहेत. चित्रपटांमध्ये त्यांनी चुनारिया हे पहिलं गाण जोहराबाई अंबालेवाली आणि गीता दत्त यांच्यासोबत मिळून गायल होत. त्यांच्या गायनाच्या विशिष्ट शैलीने आणि वेगळ्या अंदाजाने त्यांची विशेष ओळख प्रेक्षकांमध्ये निर्माण केली. त्यांच्या काही सदाबहार गाण्यांबद्दल जाणून घेऊया जी आजही लोकांच्या पसंतीची आहे.

- Advertisement -

इन आंखों की मस्ती में

- Advertisement -

पान खाए सईंया हमारो

 

दम मारो दम मिट जाए गम

मुझे रंग दे


हे हि वाचा – वयाच्या ८८व्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गाणे!

- Advertisement -