Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन HBD:'विकी डोनर' ते 'शुभ मंगल जादा सावधान' पर्यंत,आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पाडली वेगळी छाप

HBD:’विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल जादा सावधान’ पर्यंत,आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पाडली वेगळी छाप

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा(Ayushmann Khurrana) आज वाढदिवस आहे. तो 37 वर्षांचा झाला असून त्याचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगड, पंजाब येथे झाला. आयुष्ममानचे बालपणीचे नाव निशांत खुराना असे होते, पण जेव्हा आयुष्मान 3 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या पालकांनी त्याचे नाव बदलून आयुष्मान खुराना असे ठेवले. आयुष्मानला महाविद्यालयीन दिवसांपासून अभ्यासाबरोबर अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आज आपण आयुष्मानच्या आशा काही स्टिरियोटाइप ब्रेकिंग चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

- Advertisement -

2012 मध्ये आलेला ‘विकी डोनर’ हा चित्रपट आयुषमान खुरानाचा पहिला- वहिला चित्रपट होता. आयुष्मान चित्रपटात स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांची सह अभिनेत्रीच्या भूमिकेत यामी गौतम झळकली होती. आणि पहील्या चित्रपटात आयुष्मान स्टार झाला आणि आपलि वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आयुष्मानचा विकी डोनर हा चित्रपट सुपरहिट ठरला. शुक्राणू दान आणि आयव्हीएफ सारखे मुद्दे चित्रपटाद्वारे दाखवले गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

- Advertisement -

आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘दम लगाई हैशा’नेही चाहत्यांची मने जिंकली. आयुषमानची पत्नी म्हणजेच भूमी पेडणेकरने देखील या चित्रपटात उत्तम कामगिरी बजावली आहे. तिचे वजन चित्रपटात खूप जास्त दाखवण्यात आले आहे, आणि तिचे लग्न एका सडपातळ माणसाशी झाले आहे. तो माणूस अशा स्थूल ,वजनदार बायकोवर संसार करण्यात खूश नव्हता. पण अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे पतीसाठी पत्नीची लठ्ठ असणे याचा काहीही फरक पडत नाही.आणि दोघेही गुण्या गोविंदाने नांदू लागतात.

2017 साली आलेला ‘शुभ मंगल सावधान’ हा चित्रपट लैंगिकता आणि त्याचा व्यक्ती आणि समाजावर होणारा परिणामावर भाष्य करण्यात आले आहे. हा चित्रपटात देखील प्रचंड गाजला आणि बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई या चित्रपटाने केली.

वर्ष 2018 मध्ये आलेला ‘बधाई हो’ हा चित्रपट पाथ ब्रेकर चित्रपट होता. चित्रपटात आयुष्मानच्या आईची भूमिका नीना गुप्ता यांनी साकारली आहे, जी म्हातारपणात गर्भवती होते. यामुळे समाजात लोक त्यांची आणि कुटुबांची खिल्ली उडवतात. सिनेमात आयुष्मानला या बाबत नंतर अपराधीपणाची जाणीव होते. मात्र हा सिनेमा शेवटपर्यंत एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मान खुरानाचा ‘कलम 15’ हा चित्रपट समाजातील प्रचलित जातिव्यवस्थेचा पर्दाफाश करतो. मोठी जात खालच्या जातीवर कशी वर्चस्व गाजवते हे सिनेमात चित्रीत करण्यात आलं आहे. तसेच आयुष्मान खुरानाने चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘बाला’ वर्ष 2019 मध्ये आला. ‘बाला’ पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या आणि मुलींमध्ये असलेल्या सावळेपणावर , रंगभेदावर आधारीत हा सिनेमा आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतम देखील झळकल्या होत्या.

2020 मध्ये, ‘शुभ मंगल जादा सावधान’ चित्रपटात एका समलिंगी जोडप्याची प्रेमकथा दाखवली. आयुष्मान खुराना या चित्रपटात जितेंद्र मुख्य भूमिकेत होता. समलिंगी संबंधांशी संबंधित समस्या आणि आव्हाने या चित्रपटात सुंदर आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहेत.


हे हि वाचा –  ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील दाढी-पगडीमधील आमिर खान; नवा लूक स्पॉट

- Advertisement -