Happy Birthday Big B: अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याविषयी रेखाने केला होता ‘हा’ खुलासा

अमिताभ शुटींगच्या वेळी त्यांच्या डायलॉग शिवाय इतर कोणत्याही वैयक्तिक गोष्टींवर बोलायचे नाही

happy birthday Big B Rekha revealed something about relationship with Amitabh Bachchan
HBD Big B: अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याविषयी रेखाने केला होता 'हा' खुलासा

बॉलिवूड सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज त्यांचा ७९ वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि बिग बींचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे चाहते देशातच नाही परदेशातही आहेत. आपल्या अनेक सुपरहिट सिनेमांनी त्यांनी आपल्या करिअरला चार चाँद लावलेत. अमिताभ बच्चन त्यांच्या सुपरहिट सिनेमांमुळे चर्चेत असतातच मात्र अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्यासोबत त्यांचे नाव जोडल्याने बिग बी आणि रेखा यांच्या नावाची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती आणि आजही होत आहे. आजही रेखा आणि अमिताभ यांचे किस्से प्रेक्षक आवडीने ऐकतात. अमिताभ आणि रेखा यांच्या अधूऱ्या प्रेम कहाणीचे अनेक किस्से आहेत. मात्र अभिनेत्री रेखाने त्यांच्या नात्याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता.

रेखा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ‘अमिताभ यांच्याकडे अनेक गुणांचा खजिना आहे. देवाने त्यांना असा एक माणूस बनवला आहे ज्याच्यात अनेक क्वॉलिटी आहेत.’ अमिताभ आणि त्यांच्या नात्याविषयी भाष्य करताना रेखा यांनी म्हटले की, अमिताभ बच्चन यांच्यावर त्या पहिल्यापासूनच आई, बहिण, मित्र आणि जगात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जितक्याही गोष्टी आहेत त्याहून अधिक प्रेम त्या बिंग बींवर करतात. पुढे त्या म्हणाल्या की, अमिताभ शुटींगच्या वेळी त्यांच्या डायलॉग शिवाय इतर कोणत्याही वैयक्तिक गोष्टींवर बोलायचे नाही.

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा हे सिलसिला या सिनेमात एकत्र दिसले होते त्यानंतर मात्र त्यांनी कधीच एकत्र काम केले नाही. मुलाखती दरम्यान रेखाने जया बच्चन आणि त्यांच्या नात्याविषयी म्हटले की, ‘माझे जया बच्चन हिच्यासोबतही काही वाद नाहीत. आमच्यात फार चांगले संबंध होते मात्र मीडियाने आमची इमेज पूर्णपणे बदलून टाकली. आम्ही दोघीही एकाच इमारतीत राहत होतो. काही झाले तरी तिला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही आणि देवाच्या कृपेने हे तिला देखील माहिती आहे. आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा खूप प्रेमाने भेटतो.’


हेही वाचा – Amitabh Bachchan बिग बींनी आई ‘तेजी बच्चन’ यांच्याबरोबर केला होता नाटकात अभिनय