Happy Birthday : ऋतिक रोशनच्या ‘vikram vedha remake’ सिनेमाची रिलीज डेट आऊट

ऋतिक लवकरच या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सिनेमात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राधिका आपटे पाहायला मिळणार आहे. ऋतिक हा 'वेधा' या गँगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळाली आहे. या सिनेमात ऋतिकचा लूक एकदम डॅशिंग आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार आहे.

Happy Birthday: Hrithik Roshan's 'Vikram vedha remake' release date out
Happy Birthday : ऋतिक रोशनच्या 'vikram vedha remake' सिनेमाची रिलीज डेट आऊट

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या ‘विक्रम वेधा’ या सिनेमाची तारीख रिलीज झाली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर 2022 ला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ऋतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या फर्स्ट लूकचे प्रदर्शन, T-SERIES आणि Reliance Entertainment व्दारे ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे. ऋतिक लवकरच या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सिनेमात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राधिका आपटे पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ऋतिक हा ‘वेधा’ या गँगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ऋतिक एकदम डॅशिंग आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार असून, त्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

‘विक्रम वेधा’ हा सिनेमा 2017 मध्ये आलेल्या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. या मूळ चित्रपटाचे नाव ‘विक्रम वेधा असेच होते. यामध्ये अभिनेता आर माधवन आणि अभिनेता विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट एका गुंड आणि पोलिसाच्या कथेवर आधारित आहे. ‘विक्रम वेधा’ सिनेमाचे हिंदी रिमेक पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित करत आहेत, ज्यांनी मूळ चित्रपटाची निर्मितीही केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिक रोशनचा आज ४८ वा वाढदिवस आहे. त्याला सोशल मडियावर अनेक चाहत्यांनी ऋतिकला शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याची एंट्री झाली आहे. ऋतिक रोशनच्या घरचा नवा पाहुणा हा त्याच्या घरचा एक कुत्र्याचे पिल्लू आहे. या कुत्र्याच्या पिल्लाला ऋतिकने दत्तक घेतले आहे. आणि या कुत्र्याचे नाव मोगली असे ठेवले आहे. या कुत्र्याशी खेळतानाचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या पोस्टवर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.


हेही वाचा – Coronavirus : अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण