घरट्रेंडिंगHappy Birthday Jagjit singh : १५० हून अधिक अल्बम करणारे गझल सम्राट,पहा...

Happy Birthday Jagjit singh : १५० हून अधिक अल्बम करणारे गझल सम्राट,पहा त्यांच्या प्रसिद्ध गझल

Subscribe

काही कलाकार हे त्यांच्या कलेने स्वत: सोबतच इतरांचे आयुष्यही समृद्ध करतात. कलेवर त्यांची असलेली अनोखी पकड आणि त्यांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडतो. असेच एक महान कलाकार गझल सम्राट जगजीत सिंह . संगीत आणि गझलच्या दुनियेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. आपल्या अनोख्या आवाजाने श्रोत्यांसोबत आपले एक वेगळे नात त्यांनी तयार केले होते. आजही प्रत्येक वयातील व्यक्तींना त्यांची गाणी माहिती आहेत. अशा अष्टपैलू कलाकाराचा आज जन्मदिन. आज ते या जगात नसले तरीही त्यांच्या आवाजात संगितबद्ध झालेली गाणी आजही श्रोत्यांच्या सोबत आहेत. जगजीत सिंह यांच्या आयुष्याचा प्रवासही त्यांच्या गझल आणि संगीतासारखा अविस्मरणीय आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेऊयात.

जगजीत सिंह यांच्या जन्म ८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थान येथे झाला. ते मुळचे राजस्थानच्या श्रीगंगानगरचे. तिथेच त्यांचा जन्म झाला. आयुष्यात अनेक संकटे आली परंतु त्यांनी त्यांच्या गाण्याशी कधीच प्रतारणा केली नाही. जगजीत यांचे वडील अमर सिंह यांना जगजीत यांनी मोठे होऊन इंजीनिअर व्हावे असे वाटत होते. मात्र ते गझल सम्राट झाले. उस्ताद जमाल खान आणि पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडून त्यांनी संगिताचे शिक्षण घेतले. कुरुक्षेत्र विश्वविद्यालयातून त्यांनी इतिहास या विषयात पोस्ट ग्रॅज्युएश केले होते. जगजीवन यांची आई गृहिणी होती. १९६७ साली जगजीत सिंह यांचा चित्रा या विवाहितेशी त्यांचा विवाह झाला. त्याही गझल गायिका होता. चित्रा यांचा जगजीत सिंह यांच्यासी दुसरा विवाह झाला होता. त्यांना आधीच्या विवाहातून एक मुलगीही होती. जगजीत यांना एक मुलगाही झाला. मात्र दुर्दैवाने वयाच्या १८व्या वर्षी त्यांचा मुलगा कार अपघातात दगावला. असे म्हटले जाते की, या घटनेनंतर चित्रा आणि जगजीत यांच्यात खूप दुरावा आला होता. बराच काळ ते एकमेकांशी बोलत नव्हते.

- Advertisement -

जगजीत सिंह यांना त्यांच्या उत्तम कलेसाठी २००५ साली दिल्ली सरकारकडून गालिब अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर २००३ मध्येही त्यांना भारत सरकारकडून पद्म भूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. जगजीत सिंह यांची अनेक गाणी अनेक गझल प्रसिद्ध झालीत. त्यांची पत्नी चित्रासोबत त्यांचा पहिला अल्बम हिट झाला तो म्हणजे १९७६ साली ‘द अनफॉरगेटेबल्स’. यावेळी त्यांनी गझल हा प्रकार सिनेमांच्या गाण्यांप्रेमाणे सादर केला. त्यांचा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना प्रचंड भावला. गझल या प्रकाराकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा अंदाज बदलला. पंजाबी, बंगाली, गुजराती, नेपाळी अशा अनेक भाषेत जगजीत सिंह यांनी गाणी गायली आहेत.

जगजीत सिंह यांच्या प्रसिद्ध गझल

सर्वसामान्यांपर्यत गझल पोहचवण्यात जगजीवन सिंह यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी १५० हून अधिक अल्बम तयार केले. १९८० च्या दशकात जगजीत सिंह हे गझल दुनियेतील सम्राट बनले होते.

- Advertisement -

झुकी झुकी सी नजर बेकरार हे कि नही

तुमको देखा तो ये खयाल आया

प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है

होश वालो को खबर क्या

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो

होठों से छू लो तुम

२३ सप्टेंबर २०११ साली ब्रेन हॅमरेजमुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांनी भरती करण्यात आले. १० ऑक्टोबर रोजी ते हे जग सोडून गेले. २०१४ साली भारत सरकारने जगजीत सिंह यांच्या सन्मानार्थ डाक तिकिट जाहिर केले.


हेही वाचामुलासोबत सिंहगडावर ‘श्रीमान योगी’ वाचताना प्रवीण तरडेंचा पालकत्वाचा सल्ला, म्हणाले…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -