बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिचा आज वाढदिवस. अनेक बॉलिवूड सिनेमामधून जियाचा अभिनय पहायला मिळाला. फार कमी कालावलधीत जियाने तिच्या करियरमध्ये यश मिळवले होते. जियाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. त्यावर तिने मातही केली मात्र शेवटी तिने स्वत:चे आयुष्य संपवले. आयुष्यात आलेल्या अडचणींची जियाला फार मोठी किंमत मोजावी लागली. जियाचा मृत्यू होऊन सात वर्षे झाली आहेत. मात्र तरीही तिच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ३ जून २०१३ला जियाने आत्महत्य करुन तिचे आयुष्य संपवले. जिया खान ही ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री त्याचबरोबर उत्तम गायिका होती. २००७ मध्ये जिया भारतीय सिनेसृष्टीत आली. रामगोपाल वर्माच्या निशब्द सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अमिर खानच्या गजनी सिनेमातही मुख्य भूमिका साकारली होती. हाउसफुल या सिनेमातही जिया दिसली होती. या सिनेमाच्या नंतर जियाने आत्महत्या केली. जियाच्या मृत्यूचे कारण आजही समोर आलेले नाही.
जियाचा जन्म हा २० फेब्रुवारी १९८८ सालचा. जियाचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला मात्र तिचे बालपण लंडनमध्ये गेले. जियाचे खरे नाव नफीसा खान असे आहे. जियाची आईही अभिनय क्षेत्रात होती. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा रंगीला हा सिनेमा पाहून जियाने सिनेसृष्टीत येण्याचे ठरवले होते. दिल से या सिनेमातही जियाने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. दिल से या सिनेमात जियाने छोट्या मनीषा कोईरालाची भूमिका साकारली होती.
जियाने काही सिनेमे केल्यानंतर तिला काम मिळत नव्हते. त्यातून आलेल्या नैराश्यातून जियाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र अनेकांची अशी मते होती की, जियाची आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला आहे. जियाच्या आत्महत्येमागचे गूढ आजही कायम आहे. जियाने आत्महत्या केली त्यावेळेस तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याच्यासोबत तिचे संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जियाने आत्महत्या करण्याआधी सूरज पांचोलीने जियाला १० मेसेज केले होते त्यात अनेक शिव्याही वापरल्या होत्या. त्यानंतर तिने आत्महत्या केली. आत्महत्येच्या दिवशी जिया सूरजला सतत फोन करत होती, असा खुलासा तिच्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे.
हेही वाचा – यामुळे अभिनेता विवेक ओबेरॉयविरोधात केली दंडात्मक कारवाई