घरताज्या घडामोडीhappy birthday sanjay dutt: 'केजीएफ चॅप्टर २' मधील संजूबाबाचा खतरनाक लूक समोर

happy birthday sanjay dutt: ‘केजीएफ चॅप्टर २’ मधील संजूबाबाचा खतरनाक लूक समोर

Subscribe

आज बॉलिवूडचा ‘संजूबाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्तचा जन्मदिवस (sanjay dutt birthday) आहे. या दिवशी खरंतर चाहत्यांनी संजय दत्तला गिफ्ट द्यायला पाहिजे, परंतु संजय दत्तने वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांनाच गिफ्ट दिलं आहे. संजय दत्तने आगामी चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ (kgf chapter 2) मधीर स्वतःचा म्हणजेच अधीराच्या लूकचा पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अधीराच्या लूकमध्ये संजय दत्त खतरनाक दिसत आहे.

हातात दोधारी तलवार असलेल्या नव्या पोस्टरमुळे संजय दत्तच्या चाहत्यांमध्ये आता आणखीनच उत्सुकता वाढली आहे. पोस्टर शेअर करत संजय दत्तने वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. संजय दत्तने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की, ‘जन्मदिवसाच्या शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. केजीएफ चॅप्टर २ सोबत काम करणे एक अद्भूत होते. तुम्ही सर्वजण बऱ्याच काळापासून चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत आहात, हे मला माहित आहे. तुमची प्रतिक्षा व्यर्थ ठरणार नाही, अशी मी तुम्हाला खात्री देतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

- Advertisement -

केजीएफ चॅप्टर २ मधील अधीराचा हा खतरनाक लूक शेअर करून तीन तास झाले आहेत. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. संजय दत्तचा हा तिसरा जन्मदिवस आहे, ज्यादिवशी चित्रपटाचा तिसरा पोस्ट रिलीज केला आहे. २०१९मध्ये संजय दत्तने ब्लॅक अँड व्हाइट पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवत लिहिले होत की, ‘धन्यवाद यश, केजीएफमध्ये अधीराच्या रुपात असल्यामुळे मी खूप खूश आणि उत्साहित आहे. लवकरच भेटू या राक्षसाला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

- Advertisement -

हेही वाचा – Video: सोनू सूदने टक्कल असलेल्या व्यक्तीची अशी केली हेअर स्टाईल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -