Happy Birthday Sumona : आपल्या दमदार अभिनयाने छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवतेय सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्ती आज २४ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करते आहे. १९९९ मध्ये अभिनेता आमिर खान( aamir khan) आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या 'मन'( mann) या चित्रपटातून अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने आपल्या अभिनय कारकिर्दीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

‘द कपिल शर्मा शो’ ( the kapil sharma show) हा रिलॅलिटी शो प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या शो ने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या शो ची प्रसिद्धी केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. या शो मध्ये काम करणाऱ्या कलाकारांनाही खूप प्रसिद्धी मिळाली. या शो मध्ये भुरी ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री सुमोना (sumona chakravarti) चक्रवर्ती हीने तिच्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या खास अंदाजाने
प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुमोना चक्रवर्ती आज २४ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करते आहे.

हेही वाचा – तापसी पन्नू अभिनित अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’चा 23 जून रोजी लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर!

अभिनेत्री सुमोना (sumona chakravarti) चक्रवर्ती ही गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रम आणि मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा या शो मध्ये भुरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे. सुमोना तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुमोनाने वयाच्या ११ व्या वर्षी सिने सृष्टीमध्ये पदार्पण करत तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुमोना चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून ‘द कपिल शर्मा शो’ (the kapil sharma show) चा एक भाग आहे. या शो मध्ये येण्यापूर्वी सुमोनाने अनेक मालिका आणि रिऍलिटी शो मधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

हेही वाचा – किच्चा सुदीपच्या बहुप्रतिक्षित ‘विक्रांत रोना’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

त्याचप्रमाणे १९९९ मध्ये अभिनेता आमिर खान (aamir khan) आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या ‘मन'( mann) या चित्रपटातून अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने आपल्या अभिनय कारकिर्दीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटात सुमोनाने नेहा नावाच्या एका शालेय विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटात काम केल्यानंतर मात्र सुमोना चक्रवर्ती छोट्या पडद्याकडे म्हणजेच मालिकांकडे वळली. सुमोनाने अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. पण सुमोनाला खरी ओळख मिळाली ती ‘बडे अच्छे लागते है'(bade acche lagate hai) या मालिकेमुळे. या मालिकेत सुमोनाने नताशा कपूर ही व्यक्तिरेखा साकारली होती. अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा आजतागायतचा पडद्यावरचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. ‘बडे अच्छे लागते है’ या मालिकेनंतर सुमोनाने ‘कहानी कॉमेडी सर्कस की’ या शो मध्ये सुद्धा भाग घेतला होता. या शो मध्ये कपिल शर्मा सुद्धा तिच्या सोबत होता. कपिल शर्मा आणि सुमोना यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंग मुळे सुमोनाने हा शो जिंकला होता. या शो नंतर २०१३ ते २०१७ या काळात कपिल आणि सुमोना ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ ( comedy nights with kapil) या शो मध्ये पुन्हा एकत्र दिसले. त्या नंतर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सुमोनाने सुरवातीला सरला गुलाटीची भूमिका साकारली होती. ‘द कपिल शर्मा शो’ मुळे सुमोनाची लोकप्रियता दिवसागणिक वाढतेच आहे.

हेही वाचा – हेमांगी विचारतेय ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ नेटकऱ्यांकडून मिळालं सनसनीत उत्तर

सोमनाने ‘मन’ या चित्रपटात जशी भूमिका साकारली होती त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खानच्या (salman khan) ‘किक’ या चित्रपटात आणि रणबीर कापूर,( ranbir kapoor) प्रियांका चोप्रा( priyanaka chopra) यांच्या ‘बर्फी’ या चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या होत्या.