Happy Birthday vandana gupte : वंदना गुप्ते साजरा करतायत त्यांचा ७० वा वाढदिवस

वंदना गुप्ते आज म्हणेजच १६ जून २०२२ रोजी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मराठी सोबतच हिंदी कला विश्वातही वंदना गुप्ते यांनी स्वतःच्या अभिनयाचा ठसा उपटवला आहे. जेष्ठ गायिका माणिक वर्मा या वंदना गुप्ते यांच्या आई. घरातच एवढा मोठा कलावारसा असल्याने वंदना यांना लक्षणपणापासूनच कलेचे बाळकडू मिळाले.

मराठी चित्रपट सृष्टी आणि नाट्य सृष्टीसोबतच मालिकांमधून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगकल्ली छाप पडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते. वंदना गुप्ते आज म्हणेजच १६ जून २०२२ रोजी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मराठी सोबतच हिंदी कला विश्वातही वंदना गुप्ते यांनी स्वतःच्या अभिनयाचा ठसा उपटवला आहे. जेष्ठ गायिका माणिक वर्मा या वंदना गुप्ते यांच्या आई. घरातच एवढा मोठा कलावारसा असल्याने वंदना यांना लक्षणपणापासूनच कलेचे बाळकडू मिळाले.

हे ही वाचा – ‘मणिके मागे हिथे’ फेम योहानीची रणवीर सिंह सोबत काम करण्याची इच्छा

वंदना गुप्ते यांनी आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. वंदना गुप्ते यांचा जन्म १६ जुलै १९५२ रोजी झाला. आज त्यांनी त्यांचं वयाची ७० वर्षे पूर्ण केली आहेत. वंदना गुप्तेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याच बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. वंदना गुप्तेंनी त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी कलासृष्टी सजवली. प्रेक्षकांच्या मनात अमेट ठसा उमटवला. या सदाबहार अभिनेत्रीने त्यांच्या वयाची ७० वर्षे पूर्ण केली आहेत.

हे ही वाचा –  ‘टकाटक २’चं मोशन पोस्टर प्रदर्शित, चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये आतुरता

वंदना गुप्ते यांनी पछाडलेला, फोटोकॉपी, डबल सीट, मातीच्या चुली, मर्डर मेस्त्री, बकेट लिस्ट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. वंदना गुप्ते यांनी पछाडलेला या चित्रपटात साकारलेली दुर्गा मावशी ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. आजही ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वंदना गुप्ते यांनी प्रेमळ आई, खट्याळ सासू अश्या अनेक छटा असलेलया भूमिका रंगवल्या आहेत. वंदना गुप्ते यांच्या आई माणिक वर्मा भारतीय गायिका होत्या. माणिक वर्मा हे नाव ऐकताच त्यांची अनेक गाणी क्षणार्धांत मानतात रुंजी घालतात. माणिक वर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

हे ही वाचा –  चला हवा येऊ द्याच्या मंचावर शहाजी बापू पाटलांचं ‘ओक्केमध्ये’ स्वागत

वंदना गुप्ते आणि भरती आचरेकर या बहिणींची जोडी मराठी सिने विश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणून ओळखली जाते. वंदना आणि भरती या दोन बहिणींनी मराठी आणि हिंदी मध्येही उत्तम काम केले आहे. त्याच बरोबर वंदना गुप्ते यांना बेळगाव येथे झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात गोगटे फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.