घरमनोरंजनहरभजन सिंगने अभिनेता सोनू सुदवर केला कौतुकाचा वर्षाव!

हरभजन सिंगने अभिनेता सोनू सुदवर केला कौतुकाचा वर्षाव!

Subscribe

भारतीय सुप्रसिद्ध क्रिकेटर हरभजन सिंग याने देखील सोनू सुदचे आभार मानत , प्रशंसा केली आहे.हरभजन सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करून कर्नाटक मधील रुग्णालयात दाखल असणार्‍या कोरोनाबधिताकरिता रेमडेसवीर इंजेक्शनचा शोध करत आहे असं ट्विट केलं होतं.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचे संकट येऊन वर्ष-दिढ वर्ष पालटले असले तरी,भारतामध्ये कोरोनाचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहे. कोरोनाबधितांचा आकडा लाखो पार करत असून आपुर्‍या सोयी सुविधे अभावी कोरोनारुग्ण दगावत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत अभिनेता सोनू सुद लोकांसाठी मसीहा बनून मदतीसाठी धावून आला. गेल्या वर्षभरापासून सोनू सुद कोरोना संकटात लोकांची मदत करत आहे. सर्व स्तरावरून सोनूच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. नुकतच भारतीय सुप्रसिद्ध क्रिकेटर हरभजन सिंग याने देखील सोनू सुदचे आभार मानत , प्रशंसा केली आहे.हरभजन सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करून कर्नाटक मधील रुग्णालयात दाखल असणार्‍या कोरोनाबधिताकरिता रेमडेसवीर इंजेक्शनचा शोध करत आहे असं ट्विट केलं होतं. या ट्विटवर तत्काळ प्र्तिक्रिया देत सोनू सुद पुढे आला आणि हरभजनच्या ट्विटवर उत्तर देत लिहलं की,” भज्जी… लवकरच इंजेक्शन पोहचेल.”सोनू सुदच्या या कामगिरीबद्दल हरभज सिंग याने आनंद व्यक्त करत भरभरून कौतुक करत रिट्विट करून लिहलं आहे की,” धन्यवाद माझ्या भावा… देव तुला अजून शक्ति देईन”

- Advertisement -

तसेच काही दिवसांपूर्वी  भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ऑक्सिजन सिलेंडरबाबत ट्विटरवरून विचरणा केली होती . ‘मला मेरठ येथे माझ्या मावशीसाठी त्वरित ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता आहे.ती ६५ वर्षांची असून तिला फुफ्फसांच्या संसर्गाने ग्रासले आहे,’ असे रैना त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. तसेच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही त्याच्या ट्विटमध्ये टॅग केले. परंतु, त्याच्या या ट्विटला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने उत्तर दिले. सोनू करत असलेल्या या कामाचे सोशल मीडिया आणि मीडियातून नेहमीच कौतुक होते.नुकतच अभिनेता सोनू सुद याने फ्रान्स मधून सुद्धा ऑक्सिजन प्लांट मागवले आहेत. एक स्टेटमेंट प्रकाशित करून सोनू सुदने याबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘पवित्र रिश्ता २’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला,चाहत्यांनी दिला सुशांतच्या आठवणींनी उजाळा

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -