घर मनोरंजन हार्दिक-नताशाने केलं हिंदू पद्धतीने लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हार्दिक-नताशाने केलं हिंदू पद्धतीने लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Subscribe

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलनटाईन डे’च्या दिवशी ख्रिश्चन पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केले. तसेच काल (16 फेब्रुवारी) रोजी ही जोडी हिंदू परंपरेनुसार राजस्थानातील उदयपुरमध्ये विवाहबद्ध झाली. आपल्या लग्नाचे फोटो दोघांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये हार्दिक-नताशा रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. यात हार्दिकने गोल्डन शेरवानी परिधान केली आहे तर नताशाने गोल्डन लेहंगा आणि रेड ओढणी परिधान केली आहे. तसेच नताशाने लाल रंगाची साडी देखील परिधान केली आहे. या लूकमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे. त्यांच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक सहभागी झाले होते.

हार्दिक-नताशा 2020 पासून एकत्र

- Advertisement -

हार्दिकने 1 जानेवारी 2020 रोजी नताशाला क्रूझवर प्रपोज केले होते. त्यावेळीच दोघांनी एंगेजमेंट देखील केली. त्यानंतर जुलै 2020 मध्ये हार्दिक आणि नताशाचे घाईगडबडीत लग्न झाले होते. कदाचित त्यावेळी नताशा गरोदर होती. त्यामुळे त्यांना पहिले लग्न धूमधडाक्यात करता आले नव्हते.

 


- Advertisement -

हेही वाचा :

“लग्न मनापासून होते, बाकी सर्व…” स्वराला आणि फहादच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया

- Advertisment -