Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'हरिओम' सिनेमाचे दुसरे पोस्टर लाँच

‘हरिओम’ सिनेमाचे दुसरे पोस्टर लाँच

हरिओम घाडगे, गौरव कदम साकारणार प्रमुख भूमिका

Related Story

- Advertisement -

श्रीहरी स्टुडिओ प्रस्तुत ‘हरीओम’ या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले होते. या पोस्टरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यावेळी या पोस्टरमधील पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या दोन तरुणांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यानंतर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पहिल्या पोस्टच्या तुलनेत या पोस्टरमधून तरी चित्रपटात प्रेक्षकांना काहीतरी हटके पाहायला मिळणार हे नक्की. या पोस्टरमधील चेहऱ्यांवर पडदा असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. अखेर या कलाकारांवरील पडदा आता उठला असून या दोन्ही कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. या दोघांच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला दोन उमदे कलाकार मिळणार आहेत. हरिओम घाडगे यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली असून, ते या सिनेमात मोठ्या भावाची म्हणजेच हरीची भूमिका साकारणार आहेत. तर ओमची भूमिका गौरव कदम साकारणार आहे. गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना शरीरयष्टी घडवण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे.

हरिओम आणि गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात दोघे भावंडांची भूमिका साकारत असल्याने, त्यांच्यातील केमेस्ट्री खरी वाटावी, यासाठी शूटिंगच्या आधी काही महिने ते एकत्र राहिले. या दरम्यान त्यांनी तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शिवकालीन मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांच्या डाएटवर, व्यायामावरही लक्ष केंद्रित केले इतकेच नाही तर दोघांनी एकत्र स्वयंपाकही केला. बराच काळ एकत्र व्यतीत केल्यामुळे त्यांच्यात भावनिक नाते तयार झाले आणि या नात्याचेच प्रतिबिंब प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, रहस्यावर आधारित हा सिनेमा एंटरटेनमेंट पॅकेजचा धमाका असणार आहे. आशिष नेवाळकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी हा चित्रपट साधारण मेपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


हेही वाचा- राखी सावंतच्या बाळाला पाहिलत का? पाहा व्हिडिओ

- Advertisement -