Miss Diva Universe India 2021 – हरनाज संधू ठरली विजेती, पाहा फोटो

Harnaaz Sandhu wins Miss Universe India 2021 title
Miss Diva Universe India 2021 - हरनाज संधू ठरली विजेती, पाहा फोटो

पंजाबच्या चंडीगढची राहणारी हरनाज संधू (Harnaaz Sandhu) ‘मिस डिवा युनिव्हर्स इंडिया २०२१’ (Miss Diva Universe India 2021) विजेती ठरली आहे. हरनाजने ‘मिस डिवा युनिव्हर्स इंडिया’ नावे केल्यानंतर ‘मिस युनिव्हर्स २०२१’मध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. हरनाज संधूसोबत पुण्याच्या रितिका खतनानीने ‘लीवा मिस डीवा सुपर नॅचरल २०२१’ हा किताब जिंकला आहे. तर जयपूरच्या सोनल कुकरेजा हिने ‘लीवा मिस डीवा’ची फर्स्ट रनर-अप ठरली आहे. सध्या हरनाज संधूवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HARNAAZ SANDHU (@stanxharnaaz)

‘मिस डीवा युनिव्हर्स’ जिंकल्यानंतर हरनाज संधूचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हरनाज एक मॉडेल असून तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या चित्रपटातील हरनाजची भूमिका चांगलीच चर्चेत राहिली. हरनाज संधूने आपल्या शिक्षणाची सुरुवात चंदीगढच्या शिवालिक पब्लिक शाळापासून केली. तिने चंदीगडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१८ साली हरनाजने ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार’चा किताब आपल्या नावे केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by pageantnews (@_pageantology_)

दरम्यान हरनाजला बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननने ‘मिस डिवा युनिव्हर्स २०२१’चा किताब दिला. हरनाज संधूसोबत टॉप १० फायलिस्टमध्ये अंकिता सिंह, आयशा असदी, दिविता राय, निकिता तिवारी, पल्लबी सैकिया, रितिका खतनानी, सिद्धि गुप्ता, सोनल कुकरेजा आणि तारिणी कलिंगरायर यांचा समावेश होता.


हेही वाचा – पायाला दुखापत होऊनही बिग बी करतायत KBC 13 शूटिंग, फोटो झाला व्हायरल