घरमनोरंजनHarry Potter च्या घरी पाळणा हलला, प्रेयसीने दिला गोंडस बाळाला जन्म

Harry Potter च्या घरी पाळणा हलला, प्रेयसीने दिला गोंडस बाळाला जन्म

Subscribe

हॅरी पॉटर ही सिनेमाची अशी एक सीरिज होती ज्याबद्दल तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या बालपणीच्या काही गोष्टी आठवतात. यामध्ये मुख्य भुमिकेतील हॅरी पॉटर म्हणजेच अभिनेता डेनियल रेडक्लिफच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तो बाबा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्याची प्रेयसी आणि हॉलिवूड अभिनेत्री एरिन डार्के बद्दल अशा बातम्या आल्या होत्या की, ती प्रेग्नेंट आहे. आता कपलने त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

हॅरी बाबा झाल्यानंतर चाहत्यांकडून त्याला आणि त्याच्या नव्या बाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. पण अद्याप याची अधिकृत माहिती कपलने शेअर केलेली नाही. तसेच हे सुद्धा सांगितलेले नाही की, त्यांना मुलगा झाला आहे की, मुलगी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daniel Radcliffe (@daniel9340)

- Advertisement -

खरंतर डेनियल आणि त्याची प्रेयसी एरिन डार्के हे दोघे एकमेकांना खुप वर्षांपासून डेट करत आहेत. त्यांचे लग्न सुद्धा झालेले नाही. अशातच आता त्यांनी आपल्या आयुष्यात नव्या बाळाचे स्वागत केले आहे.

- Advertisement -

फॅनपेजवर शेअर केलेल्या पोस्टवर त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका युजरने म्हटले की, पहिल्यांदा बाबा झाल्यान तुला शुभेच्छा. आणखी एका फॅनने लिहिले की. Awe हॅरी पॉटर आता मोठा झाला आहे.
त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर तो ‘द लॉस्ट’मध्ये दिसला होता. या व्यतिरिक्त ‘वी डू नॉट फॉरगेट’ आणि ‘मिस साराजेवो’ मध्ये ही झळकला होता.

 


हेही वाचा- Shah Rukh आर्यन खानने लाँच केला स्वत:चा क्लोथिंग ब्रॅण्ड, पाहा व्हिडीओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -