तब्बल तीन महिन्यांनी हर्ष-भारतीने शेअर केला बाळाचा फोटो

२०१७ मध्ये भारतीचा हर्ष लिंबाचिया(harsh limbachiya) सोबत विवाह झाला होता. त्यांनतर पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारतीने तिच्या बाळाला जन्म दिला आणि त्या नंतर तब्बल तीन महिन्यांनी भरती आणि हर्षने त्यांच्या बाळाचा चेहरा दाखवला आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह(bharati singh) हिला ओळखले जाते. प्रेक्षकांमध्ये भारती सिंह हिची खूप लोकप्रियता आहे. २०१७ मध्ये भारतीचा हर्ष लिंबाचिया(harsh limbachiya) सोबत विवाह झाला होता. त्यांनतर पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारतीने तिच्या बाळाला जन्म दिला आणि त्या नंतर तब्बल तीन महिन्यांनी भरती आणि हर्षने त्यांच्या बाळाचा चेहरा दाखवला आहे.

हे ही वाचा –  ‘विठ्ठलाचा टिळा आणि गुगल मॅप्स अनोखं कनेक्शन’, ज्ञानेश्वर माऊली साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘ती’…

हे ही वाचा – अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटातील लूक झाला लीक; लंडनमध्ये सुरू आहे शूटिंग

नुकतंच भरती आणि हर्षने(harsh and bharati) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव सुद्धा संगितले आहे. या व्हिडीओत भरती म्हणते की तुम्ही गोला म्हणजेच माझ्या मुलाला पाहू शकणार आहात. याच संदर्भांत मला खूप मेसेज आले होते तर काहींनी टोमणे सुद्धा मारले असंही भारतीने संगितले. पण आज अखेर तुम्ही त्याला पाहू शकणार आहात. सध्या मी फार खुश आहे, आनंदी आहे असंही भारती म्हणाली. पण सध्या तो झोपला आहे त्यांची पूर्ण तयारी की तुम्ही त्याला पाहू शकाल. त्या नंतर भारती अतिशय मजेशीर अंदाजात तिच्या मुलाचा रूम दाखवते. त्यात तिने तिच्या मुलासाठी ठेवलेला पाळणा, खेळणी आणि इत्तर काही गोष्टी सुद्धा दिसत आहेत. भारती तिच्या मुलाचे डायपर बदलतानाही दिसत आहे. त्यात भारती हर्षला उद्देशून गोला अगदी त्याच्या बाबांवर गेला आहे असं म्हणते.

हे ही वाचा – रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी 119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

या व्हिडीओच्या शेवटी भरती आणि हर्ष खूप गोड पद्धीताईने त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवतात. यासाठी त्यांनी एक मिस्ट्री बॉक्स तयार केला आहे. त्या बॉक्सच्या मदतीने त्यांनी गोलाचा चेहरा दाखवला आहे. हर्ष आणि भरतीने त्यांच्या मुलाचे नाव ‘लक्ष'(laksh) असे नाव ठेवले आहे. ते दोघेही त्याला प्रेमाने गोला(gola) असं म्हणतात. दरम्यान या गोंडस बळावर प्रेक्षक सुद्धा प्रेमाचा वर्षांव करत आहेत.

हे ही वाचा –  ‘सीता रमण’ चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत