हरियाणाच्या प्रियंका जुनेजाने पटकावला ‘मिसेस विश्व सुंदरी’ होण्याचा खिताब

हरियाणाच्या पानीपतमधील प्रियंका जुनेजाने आपल्या देशाची मान उंचावलेली आहे. भारतात १ ते ७ मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या एमएस यूनाइटेड नेशंस वर्ल्ड २०२२ मध्ये प्रियांकाने विश्व सुंदरी होण्याचा खिताब जिंकलेला आहे. या स्पर्धेत ६२ देशाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मात्र या स्पर्धेत सर्व स्पर्धकांना मागे टाकत भारताच्या प्रियंका जुनेजाने मिसेस विश्व सुंदरी होण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेचे एकूण ७ राउंड झाले होते. ज्यामध्ये स्पर्धकांना स्पोर्ट्स , टॅलेंट, हाई फॅशन, रँप वॉक, सोशल अँन्ड वालंटियर वर्क पोर्टफोलियो आणि इवनिंग गाउन राउंड यांचा सहभाग होता.

इंटरव्हू सेशनमध्ये परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रियंकाने दिलेले उत्तर ऐकून परिक्षक खूप खूश झाले. परिक्षकांनी प्रियंकाला विचारलं की, यूक्रेन-रशियामध्ये युद्ध चालू आहे, यामध्ये तुम्ही कोणाची साथ द्याल? यावर प्रियंकाने उत्तर दिलं की, ती कोणत्याही देशाची साथ न देता फक्त माणुसकीची साथ देईल. यासोबतचं परिक्षकांनी तिला दुसरा प्रश्न विचारला की, जगभरात वाढत्या ग्लोबल वार्मिंग वर तुमचे काय मत आहे? यावर प्रियंकाने उत्तर दिलं की, यासाठी ती स्वताःपासून सुरूवात करेल, कारण पहिली सुरूवात स्वताःपासून होईल तेव्हा रिजल्ट जास्त चांगला येईल.

खरंतर प्रियंका जुनेजाचे लग्न झाले असून ती दोन मुलांची आई आहे. तिने २०२० मध्ये मिसेज इंडिया २०२० चा खिताब जिंकला होता. मिसेस इंडियाच्या स्पर्धेसाठी तिने २ महिन्यात ५७ किलो वजन केले होते. प्रियंका जुनेजा ने एसडी पीजी कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केले आहे.


हेही वाचा :‘गोदावरी’ चित्रपटासाठी जितेंद्र जोशीने पटकावला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार